नववर्षानिमित्त बुधवार पहाटे ३ वाजल्यापासून Shri Siddhivinayak दर्शन सुरू होणार

76

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी येत असलेल्या भविकांसाठी पहाटे ३ पासून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर (Shri Siddhivinayak) दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष रांगाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • पहाटे १.३० ० ते ३.०० वा. काकड आरती व महापूजा
  • पहाटे ५.३० ते पहाटे ६.०० वा. पर्यंत आरती
  • दुपारी ११.५० ते १२.३० वा. पर्यंत श्रींचा नैवेद्य
  • सायं ६.५० ते ७.०० वा. धुपारती
  • रात्री ७.३० ते ८.०० वा. पर्यंत आरती.

(हेही वाचा New Year 2025 : वरळी, लोअर परेल आणि महालक्ष्मी भागांतील पब, रेस्टोबार, रेस्टॉरंटची झाडाझडती; ६ रेस्टॉरंटवर कारवाई)

नवीन वर्षात स्वप्न आकांक्षांची, इच्छांची पूर्ती व्हावी, असे साकडे घालण्यासाठी दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या प्रारंभाला प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविक रांगा लावून दर्शन घेतात. दर्शनासाठी होत असलेली गर्दी पाहता श्री दर्शन तसेच इतर कार्यक्रमांची विशेष आखणी न्यास व्यवस्थापनाने केली आहे. नववर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात मंदिरात भाविकांची गर्दी असते. दर्शनासाठी लाखो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. मोठ्या संख्येने येत असलेल्या भाविकांना श्री दर्शन सुकर व्हावे यासाठी पोलीस आणि मंदिर न्यास प्रशासनाने रांगाचे विशेष नियोजन केले आहे, असे गणपती मंदीर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी सांगितले. (Shri Siddhivinayak)

नव वर्ष बुधवारी रात्री १२ वाजता सुरु झाल्यानंतर मध्यरात्री १.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत मंदीरात काकड आरती व महापूजा असणार आहे. त्यानंतर पहाटे ३.१५ वाजल्यापासून श्रींचे दर्शन सुरू होईल..पहाटे ३.१५ ते ५.१५ वा. पर्यंत सकाळी ६.०० ते दुपारी ११.५० वा. पर्यंत दुपारी १२.३० ते सायं ६.५० वा. पर्यंत रात्रौ ८.०० ते १०.३० वा. पर्यंत. (Shri Siddhivinayak)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.