मुख्यमंत्री आरोपीची हयगय करतील असे वाटत नाही; Pravin Darekar यांचा विश्वास

69
मुख्यमंत्री आरोपीची हयगय करतील असे वाटत नाही; Pravin Darekar यांचा विश्वास
  • प्रतिनिधी

बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना चोख प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांचे राजकारण महाराष्ट्राने, देशाने पाहिलेय. एक सुसंस्कृत आणि स्वतःच्या प्रतिमेला जपणारा नेता अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केल्याने ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीतच मात्र आरोपी कोणीही असो ते हयगय करतील असे अजिबात वाटत नाही, असा ठाम विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

(हेही वाचा – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार; पदभार स्विकारताच मंत्री Shivendra Raje Bhosale यांची ग्वाही)

माध्यमांशी बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आश्वस्त केले होते की कुणाचीही गुंडगिरी चालू देणार नाही, आरोपी कुणीही असो, कुणाशीही संबंधित असो कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका होती. त्याप्रमाणे सरकारने, पोलीस खात्याने फासे आवळायला सुरुवात केली. वाल्मिक कराड यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली. त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. अगदी पत्नीला चौकशीसाठी बोलावले. त्यामुळे आता आपल्याला गत्यनंतर नसून पोलीस मुसक्या आवळून नेतील त्यापेक्षा सरेंडर झालेले बरे या भावनेतून पोलिसांच्या दबावाला, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची कठोर भूमिका बघून त्यांना शरण यावे लागले. आता तपासात वेग येईल आणि दूध का दुध, पाणी का पाणी होईलच शिवाय जे आरोपी असतील, ज्यांच्यावर संशय घेतला जातोय त्यांच्यावरही कारवाई होणार, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

(हेही वाचा – Air Pollution : मुंबईतील प्रदुषणकारी ७७ पाव बेकरी बंद)

दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाने जणू राज्यात प्रत्येक गोष्टीचेच राजकारण करायचे ठरवले आहे.मात्र सरकारची भूमिका आरोपीच्या विरोधात कठोर असताना सगळीकडे फास आवळले असताना आणि कराड यांना आज मजबुरीने शरण यावे लागले असेल तरी तुम्ही सरकारवर, पोलिसांवर संशय घेणार असाल तर ते दुर्दैवी आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहावे. परंतु आपल्या राज्याची, पोलीस खात्याची प्रतिमा खराब होता कामा नये याची काळजी सर्वांनी घेण्याची गरज असल्याचेही आ. दरेकर (Pravin Darekar) यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री व्हावे या भाजपा आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावर बोलताना आ. दरेकर म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्र्यांकडे भूमिका ठेवतील. त्यानंतर निर्णय होईल. हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.