Indian Railway Time Table 2025 : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! नवीन वर्षात 136 वंदे भारत सुरू होणार, AI मॉडेलवर काम होणार

109
Indian Railway Time Table 2025 : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! नवीन वर्षात 136 वंदे भारत सुरू होणार, AI मॉडेलवर काम होणार
Indian Railway Time Table 2025 : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! नवीन वर्षात 136 वंदे भारत सुरू होणार, AI मॉडेलवर काम होणार

भारतीय रेल्वेचे (Indian Railway Time Table 2025) नवीन वेळापत्रक आता 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. याअंतर्गत अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक गाड्यांच्या संख्येतही बदल होणार आहेत. पूर्वी हा बदल दरवर्षी 30 जूनला व्हायचा आणि 1 जुलैपासून लागू केला जात होता. मात्र, यावेळी रेल्वे नववर्षाच्या निमित्ताने वेळापत्रकात बदल करत आहे. ‘ट्रेन्स ॲट अ ग्लान्स’ (TAG) ची ही 44वी आवृत्ती आहे. (Indian Railway Time Table 2025)

हेही वाचा-Akkalkot Accident : अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 4 ठार, 7 जखमी

रेल्वे मंत्रालय 2025 मध्ये नमो भारत रॅपिड रेल (वंदे मेट्रो) (Vande Metro), दोन अमृत भारत एक्सप्रेस (Amrit Bharat Express) गाड्या आणि सर्व 136 वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) गाड्या सुरू करण्याची योजना आखत आहे. 2024 मध्ये 64 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. 26 डिसेंबर 2024 पर्यंत भारतीय रेल्वे नेटवर्कवर एकूण 136 वंदे भारत ट्रेन सेवा धावत आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) सांगतात की, 2025 मध्ये रेल्वेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल. (Indian Railway Time Table 2025)

महाकुंभसाठी विशेष गाड्या
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभासाठी 13,000 गाड्या चालवल्या जातील, ज्यामध्ये 3,000 विशेष फेअर गाड्यांचा समावेश असेल. या महाकुंभात 45 कोटी भाविक सहभागी होतील, त्यापैकी 10 कोटी रेल्वेने प्रवास करतील असा अंदाज आहे. भारतीय रेल्वे महाकुंभ दरम्यान 1 लाख प्रवाशांच्या मुक्कामाचीही व्यवस्था करत आहे. यासाठी आयआरसीटीसीने त्रिवेणी संगमाजवळ महाकुंभ ग्राम हे लक्झरी टेंट सिटी बनवले आहे. 10 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ ग्राम मुक्कामासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग सहज करता येते. (Indian Railway Time Table 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.