नवीन वर्ष, नवीन पिढी ! Gen Z, Gen Alpha नंतर आता Gen Beta पर्व; नाव कसं पडलं जाणुन घ्या …

87
नवीन वर्ष, नवीन पिढी ! Gen Z, Gen Alpha नंतर आता Gen Beta पर्व; नाव कसं पडलं जाणुन घ्या ...
नवीन वर्ष, नवीन पिढी ! Gen Z, Gen Alpha नंतर आता Gen Beta पर्व; नाव कसं पडलं जाणुन घ्या ...

जानेवारी २०२५ ला जेन अल्फाचं युग संपून जेन बीटाचं पर्व सुरू झालं आहे. म्हणजेच २०२५ ते २०२३९ या १४ वर्षांच्या काळात जन्माला येणारी पिढी जेन बीटा (Gen Beta) म्हणून ओळखली जाणार आहे. १९८१-१९९६ हा जेन मिलिनिअलचा काळ होता, १९९६-२०१० हा जेन झेड (Gen Z) म्हणून ओळखला गेला, २०१० ते २०२४ ला जेन अल्फा (Gen Alpha) म्हणून ओळख मिळाली. तर आता नव्या वर्षांत म्हणजेच २०२५ मध्ये जन्माला येणारी मुलं जेन बीटा (Gen Beta) म्हणून ओळखली जाणार आहेत. मनी कंट्रोलने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

हेही वाचा-pune international airport वर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?

लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांच्या लेखानुसार २०३५ पर्यंत जगात जेन बीटाची १६ टक्के लोकसंख्या असेल. तसंच जेन मिलिनिअल्स आणि जेन झेडची ही मुलं असतील. तसंच,ही पिढी २२ वं शतक पाहू शकणार आहेत.(Gen Beta)

जेन बीटा नाव कसं पडलं?
जनरेशन बीटा हे जनरेशन अल्फाला फॉलो करणार आहे. त्यामुळे पहिल्या पिढीला सुचित करण्यासाठी नव्या पिढीला जेन बीटा नाव देण्यात आलंय. ही पिढी पूर्णपणे भिन्न जगाने आकार घेईल. जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. (Gen Beta)

  1. जेन बीटाची पाच महत्त्वाची वैशिष्ट्ये (Gen Beta)
    २०२४ च्या सुरुवातीपासून जगरताल आर्टिफिशिअल इंन्टेलिजन्सचा वापर सुरू झाला. जेन बीटा या नव्या यंत्रणेचा सर्रास वापर करताना दिसणार आहे. तसंच, स्मार्ट उपकरणांचाही यांच्याकडून अधिक वापर केला जाईल.
  2. सोशल मीडिया या जनरेशनसाठी त्यांची भूमिका विकसित करण्याचं माध्यम ठरणार आहे.
  3. आपत्कालीन स्थितीत शाळा बंद राहणं, सामाजिक अंतर ठेवणं अशा गोष्टींपासून ही पिढी लांब राहिल. याच्या आधीच्या पिढीने करोनोमुळे ही सामाजिक स्थिती अनुभवली आहे.
  4. लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांनी त्यांच्या जनरेशन बीटा ब्लॉगमध्ये लिहिलंय की, महत्त्वाच्या सामाजिक आव्हानांशी झुंजत या जगाला वारसा मिळणार आहे. पर्यावरणीय आव्हानांमुळे त्यांच्या सुरुवातीच्या जीवनात सामाजिक मुल्यांना आकार देतील.
  5. संशोधक जॅसन डोर्सी म्हणाले, आम्ही लहानपणी जेन मिलिनिअल्सबद्दल बोलत होतो. पण जनरेशन बीटा जनरशन अल्फापेक्षाही वेगळ्या पद्धतीने सुरू करेल. तसंच, या पिढीतील अनेकजण २२ वं शतकही पाहतील.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.