मुस्लिम ऑर्केस्ट्रा संचालकाने केले Hindu देवी-देवातांवर वादग्रस्त विधान; अश्लील हातवारे करत उडवली देवातांची खिल्ली

433
मुस्लिम ऑर्केस्ट्रा संचालकाने केले Hindu देवी-देवातांवर वादग्रस्त विधान; अश्लील हातवारे करत उडवली देवातांची खिल्ली

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातील मुबारकपुर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात एका कार्यक्रमादरम्यान मुस्लिम व्यक्तीने हिंदू (Hindu) देवी-देवतांचा आणि धार्मिक स्थळांवर वादग्रस्त विधान करत अश्लील इशारे केले. ही घटना ऑर्केस्ट्रा (Orchestra) कार्यक्रमाच्या वेळची आहे. कार्यक्रमावेळी आरोपीने मंचावर असे वादग्रस्त विधान केले की, ज्यामुळे स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडिओत दिसते की, आरोपी व्यक्ती हिंदू देवी-देवतांवर हास्यविनोद करत धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती ‘लंगडा ग्रुप ऑर्केस्ट्रा’चा मालक आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने हा सर्व प्रकार ऐकताच संतप्त व्यक्त करत आरोपीला खडसावले आहे. वृद्धेने शिवीगाळ करत त्यांच्या कृत्याचा निषेध केला. मात्र असे असतानाही कार्यक्रमाला उपस्थित अन्य लोकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोक आणि हिंदू (Hindu) संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे.

(हेही वाचा – Virar मध्ये रेल्वे रुळ वाकवला की वाकला; नागरिकांनी वर्तवली घातपाताची शक्यता)

भाजपाच्या (BJP) स्थानिक नेत्यांनी हिंदू (Hindu) धर्माचा हा अपमान असल्याचे सांगत याविरोधाच मुबारकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार नोंदवूनही अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची निष्क्रियता आणि हिंदू (Hindu) धर्माचा अपमान झाल्याचे सांगत नेत्यांनी निषेध व्यक्त केला आणि पोलिस स्टेशन प्रभारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणाबाबत समाजमाध्यमांवर लोकांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी एका सोशल मीडिया यूजरने केली आहे. प्रत्युत्तरादाखल आझमगड (Azamgarh)पोलिसांनी सांगितले की, मुबारकपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारींना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Azamgarh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.