OYO च्या रिपोर्टने केला खुलासा; जम्मू-काश्मीर नव्हे तर ‘ही’ धार्मिक स्थळे लोकांची पहिली पसंत

931

OYO ने ट्रॅव्हलपीडिया २०२४ (Travelpedia 2024) जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये लोकांना फिरण्यासाठी जास्त कोणती जागा आवडते? तसेच कोणत्या ठिकाणी फिरण्यास लोक जास्त प्राधान्य देत आहेत? या सगळ्या बाबी या रिपोर्टमध्ये नमूद आहेत. तसेच या रिपोर्टमध्ये फिरण्याबंधित बुकिंग डेटाही नमूद केला गेला आहे. या रिपोर्टमध्ये ट्रॅव्हल (Travel) संबंधित सर्व बाबी नमूद केल्या गेल्या आहेत. तसेच ट्रॅव्हल संबंधित जाहीर विषयांवर विस्तारात चर्चा केली गेली आहे. (OYO)

ओयोने जाहीर केलेल्या रिपोर्टचा आढावा घेतल्यास लक्षात येईल की पर्यटक धार्मिक स्थळांकडे (Famous religious place) जास्त आकर्षित आहेत. यामध्ये मुख्यता ओडिशा येथे स्थित असलेले धार्मिक स्थळ पुरीचा समावेश आहे. तसेच पर्यटक वाराणसी या धार्मिक स्थळाकडे फार आकर्षित आहेत. दरवर्षी भाविक मोठ्या श्रध्येने या स्थळांना भेट देत आहेत. या धार्मिक स्थळांमध्ये हरिद्वारचाही समावेश आहे. तससह पर्यटक अनेक आध्यत्मिक स्थळांकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. देवघर, पलानी तसेच गोवर्धनसारख्या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत आहेत. मुळात, येथील वास्तूंचे दर्शन घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकही मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. एकंदरीत, भारत देश जगभरातील धार्मिक स्थळांचे केंद्र बनले आहे.

(हेही वाचा – Farmer : केंद्राकडून शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट; खताच्या किमती नियंत्रणात आणणार)

देशभरातून विविध राज्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे, आणि ही वाढ ओळखण्याजोगी ठरली आहे. एकंदरीत बुकिंगमध्ये ४८% इतकी लक्षणीय वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हैद्राबाद, बेंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता या शहरांनी बुकिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेषतः राज्यांच्या बाबतीत विचार करता, उत्तर प्रदेशने या यादीत बाजी मारली आहे. याशिवाय महाराष्ट्र (Maharashtra), तेलंगणा आणि कर्नाटकसारख्या राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात बुकिंग्स नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रात उत्साह वाढल्याचे दिसून येते. OYO च्या अहवालानुसार, सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. सुट्ट्यांच्या काळात लोकांनी त्यांच्या दिवसांना संस्मरणीय बनवण्यासाठी प्रवासाला प्राधान्य दिले आहे. या बदललेल्या ट्रेंडमुळे विविध गंतव्यस्थळांना अधिक मागणी मिळाल्याचे OYO ने नमूद केले आहे.

(हेही वाचा – नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा, बाजारात सर्रास विक्री सुरू – उपसभापती Neelam Gorhe)

OYO चे ‘ग्लोबल चीफ सर्व्हिस ऑफिसर’ श्रीरंग गोडबोले म्हणाले, “2024 हे वर्ष जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने खूप वेगळे ठरले आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे, जी पर्यटन क्षेत्रासाठी एक सकारात्मक संकेत आहे.” या बदलत्या प्रवास पद्धती आणि वाढलेल्या पर्यटक संख्येमुळे पर्यटन उद्योगाला चैतन्य मिळाले आहे, आणि देशभरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी हळूहळू अधिक आकर्षक होत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.