Holiday: विद्यार्थ्यांना 2025 मध्ये तब्बल ‘इतक्या’ सुट्ट्या; वाचा सविस्तर यादी

55

2025 वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वांनी नव वर्षांचे काही ना काही संकल्प केले असतील. यामध्ये जीएसटी, ईपीएफ, पेट्रोल-डिझेलचे दर यातील बदल सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. पण या सर्वात शाळा कॉलेजची मुले नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. नव्या वर्षात (New Year) आपल्याला किती सुट्ट्या असणार? याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते. आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासासाठी वर्षभरात किती सुट्ट्या आहेत, याची यादी मुले पाहत असतात. देशातील काही शाळांमध्ये आता हिवाळी सुट्टीही सुरू झाली आहे मुलांना एन्जॉय करण्याची ही एक चांगली संधी आहे. राज्य सरकारे डिसेंबर महिन्यातच आपापल्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (2025 List of Public Holidays) जाहीर करतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा राष्ट्रीय सुट्ट्या (National holidays) सर्व राज्यात सारख्याच असतात. पण काही सुट्ट्या या राज्याप्रमाणे बदलतात. (Holiday)

बहुतेक राज्यांमध्ये हिवाळी सुट्टी

थंडीच्या दिवसात दिल्ली, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरसह इतर राज्यांमध्ये हिवाळी सुट्टी सुरू झाली आहे. जी जवळपास जानेवारीच्या मध्यापर्यंत चालेल. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्टी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू आहे. सर्व राज्यांतील शाळांना कोणत्या (Holiday for students) सुट्ट्या आहेत? जाणून घेऊया.

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी 2025
महाशिवरात्री- 26 फेब्रुवारी 2025
होळी- 14 मार्च 2025
ईद-उल-फितर- 31 मार्च 2025
महावीर जयंती- 10 एप्रिल 2025
गुड फ्रायडे- 18 एप्रिल 2025
बुद्ध पौर्णिमा- 12 मे 2025
ईद-उल-जुहा (बकरी ईद)- 7 जून 2025
मोहरम- 6 जुलै 2025
स्वातंत्र्य दिन- 15 ऑगस्ट 2025
जन्माष्टमी- 16 ऑगस्ट 2025
मिलाद-उल-नबी (ईद-ए-मिलाद)- 5 सप्टेंबर 2025
महात्मा गांधी जयंती- 2 ऑक्टोबर 2025
दसरा- 2 ऑक्टोबर 2025
दिवाळी- 20 ऑक्टोबर 2025
गुरु नानक देव जयंती- 5 नोव्हेंबर 2025
ख्रिसमस डे- 25 डिसेंबर 2025

(हेही वाचा – २६\११ दहशवादी हल्ल्याचा आरोपी Tahawwur Rana याला भारतात आणणार)

प्रत्येक राज्यातील सर्व शाळा वर देण्यात आलेल्या सुट्टीच्या दिवशी बंद राहतील. कारण या सर्व सार्वजनिक सुट्ट्या आहेत. याशिवाय राज्ये त्यांच्या संबंधित राज्यांतील शाळांमध्ये मुलांसाठी अतिरिक्त सुट्ट्याही देतात. याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय डायरीत मिळू शकेल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.