New Orleans Attack : अमेरिकेत दहशतवादी हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३० जखमी

98
New Orleans Attack : अमेरिकेत दहशतवादी हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३० जखमी
New Orleans Attack : अमेरिकेत दहशतवादी हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३० जखमी

अमेरिकेच्या (America) न्यू ऑर्लियन्स (New Orleans) शहरात भयंकर हल्ला (New Orleans Attack) झाला असून, यामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू आणि ३० लोक जखमी झाले आहेत. हल्लेखोराने न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर गर्दीत ट्रक घुसवला व नंतर वाहनातून बाहेर पडून गोळीबार करू लागला. याबाबत न्यू ऑर्लियन्स शहर पोलिसांनी माहिती दिली आहे. (New Orleans Attack)

अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स शहरातील बोर्बन स्ट्रीटवरील गर्दीत हल्लेखोराने ट्रक घुसवला. यामध्ये वाहनाखाली चिरडले गेलेल्या १२ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोराने वाहनातून बाहेर पडत गोळीबार करायला सुरूवात केली. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. (New Orleans Attack)

या घटनेवर प्रतिक्रिया देताना न्यू ऑर्लीन्सचे महापौर लाटोया कँट्रेल यांनी हा “दहशतवादी हल्ला” असल्याचे म्हटले आहे. पण, बुधवारी पहाटे ट्रक गर्दीत घुसला तेव्हा नेमकं काय घडले याचा तपास एफबीआयने सुरू केला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओमध्ये जमिनीवर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. (New Orleans Attack)

दरम्यान न्यू ऑर्लीन्स हल्ल्यातील हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले. जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे काही पुरवे सापडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एफबीआय आणि पोलीस संयुक्तपणे या हल्लामागे काय हेतू आहे याचा शोध घेण्यासाठी वाहनाची तपासणी करत आहेत. (New Orleans Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.