११ महिन्यांत फक्त १५६ Bangladeshi Infiltrators हद्दपार; १००० रुपयांत मिळतात भारतीय कागदपत्रे

93
११ महिन्यांत फक्त १५६ Bangladeshi Infiltrators हद्दपार; १००० रुपयांत मिळतात भारतीय कागदपत्रे
११ महिन्यांत फक्त १५६ Bangladeshi Infiltrators हद्दपार; १००० रुपयांत मिळतात भारतीय कागदपत्रे

बांगलादेशी घुसखोरीची समस्या देशभर भेडसावत आहे. अनेक संघटना बांगलादेशींवर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी काही प्रमाणात कारवाई होत असली, तरी ती अपुरी आहे. गेल्या ११ महिन्यांत मुंबईतून (Mumbai) बाहेर घालवलेल्या बांगलादेशींची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. विशेष शाखा एकच्या आय शाखेकडून २०२४ मध्ये सजामुक्त बांगलादेशी नागरिकांवरील कारवाईचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण)

भारतातील वास्तव्यासाठी या आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतल्याचे उघड होते. पाचशे ते दोन हजारांत भारतीय कागदपत्रे (Indian Documents) मिळवल्याचे तपासात समोर येत आहे. गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून ३६८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये मुंबईतून १४७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर, नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून महिनाभरात ४३ बांगलादेशींना अटक केली.

घुसखोरांना मदत करणाऱ्या स्थानिकांवरही होणार कारवाई

बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदेशीर काम ते करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएसने सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत संशयित बांगलादेशी नागरिकांची बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यात येणार आहे, तसेच शिधापत्रिका, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जातो.

ठाण्यातही सुरु आहे कारवाई

गेल्या ११ महिन्यांमध्ये ठाणे शहर आयुक्तालयाने ५० हून अधिक बांगलादेशींना जेरबंद केले. भिवंडीमध्ये उत्तर प्रदेश, बिहारचेही मुसलमान रहात असल्याने त्यांच्यात बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) मुसलमान सहज मिसळतात. त्यामुळे बांगलादेशींना नेमके शोधून काढून त्यांच्यावर कारवाईचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.