Pollution in Mumbai : असाही परिणाम; समुद्रकिनार्‍यापासून २०० किमी लांब समुद्रात पळाले मासे

114
Pollution in Mumbai : असाही परिणाम; समुद्रकिनार्‍यापासून २०० किमी लांब समुद्रात पळाले मासे
Pollution in Mumbai : असाही परिणाम; समुद्रकिनार्‍यापासून २०० किमी लांब समुद्रात पळाले मासे

अरबी समुद्रात (Arabian Sea) असणार्‍या दाट धुक्यामुळे मासे १८० ते २०० किमी लांब समुद्रात गेले आहेत. त्यामुळे येथील समुद्र किनारपट्टीवर मासेमारी करणार्‍यांना (fishing in mumbai) मासेमारीसाठी २०० किमी दूर समुद्रात जावे लागत आहे. त्यामुळे मासेमारी करणार्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हवामानातील सतत होणार्‍या चढउतारांमुळे माशांचा मार्गात मोठे बदल झाले आहेत. ‘बाँबे डक’ नावाचे मासे वर्सोवा समुद्राच्या किनार्‍यावर मिळत असत. आता ते पालघरच्या पुढे गुजरातजवळ मिळतात, तर कोकणातील समुद्रात आढळणारे सारडाइन मासे आता मुंबईच्या समुद्रात आढळतात. (Pollution in Mumbai)

(हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठे बदल; पहाटे धुकं, दुपारी उकाडा, रात्री थंडी)

नौकांची दृश्यमानता अल्प

हवामान विभागाच्या (Department of Meteorology) अधिकार्‍यांनी सांगितले की, पूर्वेकडून येणार्‍या हवेमुळे मुंबईपासून समुद्रात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्रात धुके ४० ते ५० मैल (नॉटीकल मील) पसरले आहे. ज्यामुळे समुद्रातील नौकांची दृश्यमानता अल्प होते. हवामानातील चढ-उतारांमुळे हे सर्व पालट झाले आहेत, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबई शहरात प्रदूषण तर आहेच; पण शहरी भागातून समुद्राच्या दिशेने वहात असलेल्या वार्‍यांमुळे ते पाण्याच्या दिशेनेही सरकले आहे.

मासेमारांनी सांगितले की, या दाट धुक्यामुळे बोटींचे अपघातही होतात. समुद्रात दूरवर गेल्यामुळे इंधनाचा, शीतकरणासाठी लागणारे बर्फ, तसेच खाण्यापिण्याच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे माशांच्या किमतीतही वाढ होते. (Pollution in Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.