ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीतही जसप्रीत बुमराहचा डंका, अश्विनला टाकलं मागे 

ICC Test Ranking : बुमराने विक्रमी ९०७ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलं आहे 

66
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीतही जसप्रीत बुमराहचा डंका, अश्विनला टाकलं मागे 
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीतही जसप्रीत बुमराहचा डंका, अश्विनला टाकलं मागे 
  • ऋजुता लुकतुके

नवीन वर्षी जसप्रीत बुमराहला एक मोठी अनपेक्षित भेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे त्याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये तर अव्वल स्थान मिळवलं आहेच. शिवाय तिथे आरूढ होताना त्याने आतापर्यंतची विक्रमी म्हणजे ९०७ गुणांची मजल मारली आहे. यापूर्वी रविचंद्रन अश्विनने ९०४ रेटिंग गुणांची कमाई केली होती. आणि तो उच्चांक होता. (ICC Test Ranking)

(हेही वाचा- New Orleans Attack : अमेरिकेत दहशतवादी हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३० जखमी)

कसोटी मानांकनाच्या सर्वकालीन यादीत बुमराह इंग्लंडच्या डेरेक अंडरवूडसह सतराव्या स्थानावर आहे. आयसीसीनेही अलीकडेच बुमराहला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराबरोबरच कसोटीतील वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून नामांकन दिलं आहे. आयसीसी क्रमवारीची प्रथा अलीकडे सुरू झाली असली तरी आयसीसीने आधीच्या खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन सार्वकालीन क्रमवारीही तयार केली आहे. आणि यात सिडनी बार्नेस (९३२) आणि जॉर्ज लोमन (९३१) हे आघाडीवर आहेत. हे खेळाडू २० व्या शतकातील आहेत. तर इमरान खान (९२२) आणि मुथय्या मुरलीधरन (९२०) हे या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बुमराह हा अश्विननंतर ९०० गुणांचा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. (ICC Test Ranking)

 ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा ९१४ गुणांसह या यादीत पाचवा आहे. तर ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या पाचांत स्थान मिळवलं आहे. २०२५ मधील आयसीसी क्रमवारीचा हा पहिला अपडेट आहे. आणि यात दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान दरम्यान बुलावायो इथं झालेली कसोटी तसंच भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यानची मेलबर्न कसोटी यांचे निकाल गृहित धरण्यात आले आहेत. (ICC Test Ranking)

(हेही वाचा- Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठे बदल; पहाटे धुकं, दुपारी उकाडा, रात्री थंडी)

पॅट कमिन्सने या कसोटीच्या दोन्ही डावांत अनुक्रमे ४९ आणि ४१ धावा केल्या. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो तिसरा आहे. तर पाकिस्तान विरुद्ध ५२ धावांत ६ बळी मिळवणारा मार्को यानसेन पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजांमध्ये भारताचा यशस्वी जयसवाल चौथ्या स्थानावर कायम आहे. तर मालिकेतील सलग दुसऱ्या शतकानंतर स्टिव्ह स्मिथ सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.