Boxing Day Test : भारताने मेलबर्न कसोटी का गमावली? शास्त्रींनी दिलं हे कारण

Boxing Day Test : चुकीच्या फटक्यांची निवड हे कारण शास्त्रींनी दिलं आहे

76
Boxing Day Test : भारताने मेलबर्न कसोटी का गमावली? शास्त्रींनी दिलं हे कारण
Boxing Day Test : भारताने मेलबर्न कसोटी का गमावली? शास्त्रींनी दिलं हे कारण
  • ऋजुता लुकतुके

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मेलबर्न कसोटीतील पराभवाला फलंदाजांचे चुकीचे फटके कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय संघाचा बोर्डर – गावसकर चषकावरील ताबाही डळमळीत झाला आहे. शास्त्री यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. पण, ‘दोन ज्येष्ठ खेळाडू आणि एका नवीन खेळाडूंनी निवडलेल्या चुकीच्या फटक्याचं विश्लेषण करावं लागेल,’ असं शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात बोलून दाखवलं आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Naxalites Surrender: १ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण)

तर डेली टेलिग्राफ या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील आपल्या स्तंभात शास्त्री लिहितात, ‘भारतीय पाठिराखे जगभरातून प्रवास करून या ऐतिहासिक ठिकाणी सामना बघण्यासाठी आले हे पाहणं आनंददायी होतं. पण, या चाहत्यांना भारताने सामना हातातून गमावणं पाहावं लागलं. पाचव्या दिवशी मधलं एक सत्र सोडलं तर इतर दोन्ही सत्रांमध्ये खेळाडूंची फटक्यांची निवड चुकली.’ मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाले, त्यावर सगळीकडून टीका होतेय. (Boxing Day Test)

१५५ धावांमध्ये भारतीय संघ सर्वबाद झाला. चहापानाच्या विश्रांतीवेळी भारतीय संघ ३ बाद १२१ धावांवर खेळत होता. पण, पुढील २२ षटकांत आणखी ३३ धावांची भर घालून ७ फलंदाज माघारी फिरले. आता बोर्डर – गावसकर चषक आपल्याकडे राखायचा असेल तर भारतीय संघाला उर्वरित सिडनी कसोटी जिंकावीच लागेल. रोहित आणि विराट यांच्या खेळात तांत्रिक चुकांबरोबर मानसिक कणखरतेचा अभाव असल्याचं मत रवी शास्त्री यांनी मांडलं आहे. तर रिषभ पंतवर खराब फटका खेळण्याचा ठपका ठेवला आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Sydney Test : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केलं बुमराहचं कौतुक; बुमराहला थांबवण्यासाठी कायदा करू असं ते का म्हणाले?)

‘तीन खेळाडूंच्या चुकीच्या फटक्यांवर बीसीसीआयमध्येही चर्चा होईल. आणि ती झालीच पाहिजे,’ असं म्हणत शास्त्री यांनी लेखाचा शेवट केला आहे. (Boxing Day Test)

कप्तानाचाच फॉर्म खराब असेल तर संघावर नियंत्रण ठेवणं त्याला कठीण जातं. उलट प्रतिस्पर्धी कर्णधार आपला खेळ उंचावत असेल तर दोघांमध्ये अपरिहार्यपणे तुलनाही होते, असंही शास्त्री यांनी बोलून दाखवलं. पॅट कमिन्सने मेलबर्न कसोटीत दोन्ही डावांत मिळून ९० धावा केल्या. आणि सामन्यांत ६ बळीही मिळवले. कमिन्सलाच सामनावीराचा खिताब देण्यात आला. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.