आता देशांतर्गत विमानांमध्येही वापरता येणार मोफत इंटरनेट; Air India ची विशेष सुविधा

62
Air India च्या विमानात मिळणार वाय-फाय सुविधा

विमानप्रवास करतांना मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा लागत असल्याने त्या वेळेचा कसा वापर करावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असली, तरी देशांतर्गत प्रवासात ही सुविधा अद्याप उपलब्ध नव्हती. आता एअर इंडियाच्या (Air India) देशांतर्गत विमानांमध्ये प्रवाशांना इंटरनेट सुविधा मिळणार आहे. त्यामुळे देशांतर्गत प्रवाशी आता विमानातही, सोशल मीडिया, ई-मेल, आवडते कार्यक्रम आणि चित्रपट ऑनलाइन पाहू शकणार आहेत.

(हेही वाचा – Naxalites Surrender: १ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण)

एअर इंडियाने, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांना वाय-फाय इंटरनेट (internet in air india) सेवा पुरवणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. दरम्यान अशा प्रकारची वाय-फाय इंटरनेट सेवा पुरवणारी एअर इंडिया देशातील पहिली एअरलाइन ठरली आहे. एअर इंडियाच्या एअर बस ३५० (Air Bus 350), बोईंग ७८७-९ (Boeing 787-9) आणि एअर बस ३२१ (Air Bus 321) निओ या निवडक विमानांमध्येच ही वाय-फाय इंटरनेट सेवा उपलब्ध असणार आहे. हळूहळू ते सर्व विमानांमध्ये ही सुविधा पुरवणार आहेत.

या वाय-फाय सेवेद्वारे प्रवाशांना त्यांचे लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोन्सवर इंटरनेट वापरता येणार आहे. विमान १० हजार फूट उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांची उपकरणे इंटरनेटला जोडण्याची परवानगी मिळणार आहे. असे असले तरी, इन-फ्लाइट इंटरनेट सुविधा कनेक्टिव्हिटी, एकूण बँडविड्थ, मार्ग आणि सरकारी निर्बंध यासारख्या घटकांवर अवलंबून असणार आहे. (Air India)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.