Chhatrapati Sambhajinagar : अचानक शाळेत घुसला रेडा अन् … ; 13 विद्यार्थी जखमी, एक गंभीर

113
Chhatrapati Sambhajinagar : अचानक शाळेत घुसला रेडा अन् ... ; 13 विद्यार्थी जखमी, एक गंभीर
Chhatrapati Sambhajinagar : अचानक शाळेत घुसला रेडा अन् ... ; 13 विद्यार्थी जखमी, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ) शहरातील टाऊन हॉल (Town Hall) येथे मॉडेल इंग्रजी शाळा (Model English School) आहे. शाळा सकाळीच्या वेळी भरली होती. विद्यार्थी आपल्या वर्गात होते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. कोणाच्या मनीध्यानी नसताना सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळेत रेडा (buffalo) घुसला. रेडा घुसलेला पाहून काही विद्यार्थी घाबरले. रेडा इकडे तिकडे पळत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही धावपळ उडाली. सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. (Chhatrapati Sambhajinagar )

हेही वाचा-Naxalites Surrender: १ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

या सर्व गोंधळात रेडाही बिथरला. तो शाळेच्या आवारात इकडे तिकडे पळू लागला. विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात शाळेत होते. त्यामुले ते ही एका ठिकाणी जमा झाले. अशा वेळी रेड्यांनी काही मुलांना जोरदार धडक दिली. त्यात 13 विद्यार्थी जखमी झाले. त्यातील एक विद्यार्थी गंभीर आहे. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Chhatrapati Sambhajinagar )

हेही वाचा-Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण

काहींच्या हाताला तर काहींच्या पायाला जबर मार लागला आहे. हा रेडा शाळेत अचानक कसा काय घुसले हे समजू शकले नाही. मात्र त्यांच्या शाळेत घुसण्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले. (Chhatrapati Sambhajinagar )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.