Attack in US Night Club : अमेरिकेत २४ तासांत तिसरा हल्ला; आता नाईट क्लबवर गोळीबार

93
Attack in US Night Club : अमेरिकेत २४ तासांत तिसरा हल्ला; आता नाईट क्लबवर गोळीबार
Attack in US Night Club : अमेरिकेत २४ तासांत तिसरा हल्ला; आता नाईट क्लबवर गोळीबार

गर्दीमध्ये ट्रक घुसवून पहिला हल्ला करण्यात आला होता, यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हॉटेलच्या आवारात टेस्ला सायबर ट्रक घुसवून बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता.

ख्रिस्ती नववर्षाच्या सुरुवातीला अमेरिका सलग तिसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरली आहे. गर्दीमध्ये ट्रक घुसवून पहिला हल्ला करण्यात आला होता, यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलच्या आवारात टेस्ला सायबर ट्रक घुसवून बॉम्ब स्फोट घडविण्यात आला होता. या घटनेला २४ तास होत नाही, तोच न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या क्वीन्स शहरातील अमाचुरी नाईट क्लबमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. (Attack in US Night Club)

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीतही जसप्रीत बुमराहचा डंका, अश्विनला टाकलं मागे )

११ जणांना गोळ्या लागल्याचा प्राथमिक अंदाज

गोळीबाराची घटना घडताच न्यूयॉर्क (New York) पोलिसांच्या अनेक टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अद्याप काही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नसून तिन्ही घटनांत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले आहेत. नाईट क्लबवरील गोळीबाराच्या घटनेत ११ जणांना गोळ्या लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. २४ तासांतील ही तिसरी घटना आहे.

एफबीआयकडे तपास

पहिल्या घटनेत न्यू ऑर्लेन्स (New Orleans) येथील बॉरबॉन मार्गावर नववर्षाच्या स्वागताला असंख्य लोक जमा झाले होते. त्याचवेळी एका चालकाने पिकअप ट्रक गर्दीत घुसवला. चालकाने गोळीबार केल्याचेही काही जणांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत लास वेगासमधील (Las Vegas) ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलबाहेर सायबर ट्रकमध्ये ब्लास्ट घडविण्यात आला आहे. सायबर ट्रक स्फोटात एका व्यक्तीचा जो चालक होता त्याचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणांचा एफबीआय तपास करत आहे. घटनास्थळी फटाके, गॅसची टाकी आणि इंधनाचे अवशेष मिळाले आहेत. (Attack in US Night Club)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.