Veer Savarkar यांच्या नावाने दिल्लीत कॉलेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

119
Veer Savarkar यांच्या नावाने दिल्लीत कॉलेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
  • प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या नावाने महाविद्यालयाची पायाभरणी करणार आहेत. दिल्ली विद्यापीठाचे हे महाविद्यालय दिल्लीच्या पश्चिम भागातील नजफगड येथे बांधले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारचा दिवस शैक्षणिक कार्याला समर्पित राहणार आहे. देशाच्या राजधानीत दोन नवीन विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यात पूर्व आणि पश्चिम दिल्लीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी नवीन विद्यापीठ बांधले जाणार आहे. त्याची आधारशिला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मांडली जाईल.

(हेही वाचा – Air Marshal Jitendra Mishra बनवे पश्चिम हवाई मुख्यालयाचे प्रमुख)

महत्त्वाचे म्हणजे, जगात नावाजलेल्या दिल्ली विद्यापीठाचे एक कॉलेज पश्चिम दिल्लीतील नजफगड या भागात बांधण्याची योजना आहे. या कॉलेजला स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नाव देण्यात आले आहे. या कॉलेजचा पायाभरणी समारंभ सुद्धा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने 2021 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या नावाने कॉलेज बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. यावर जवळपास 140 कोटी रुपये खर्च येणार आहे.

(हेही वाचा – Sydney Test : ऑस्ट्रेलियन संघात बो वेबस्टर हा नवीन चेहरा, मिचेल स्टार्क खेळणार)

पंतप्रधान दोन नवीन विद्यापीठांच्या कॅम्पसची करतील पायाभरणी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्लीत दोन विद्यापीठांची पायाभरणी सुद्धा केली जाणार आहे. दिल्ली विद्यापीठात आधीच उत्तर आणि दक्षिण कॅम्पस आहे. प्रस्तावित विद्यापीठाचे हे कॅम्पस पूर्व आणि पश्चिम दिल्लीत बांधली जाणार आहेत. पूर्व दिल्लीतील कॅम्पस सूरजमल विहार येथे बांधले जाणार आहे. यावर अंदाजे 373 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर पश्चिम दिल्लीतील कॅम्पस द्वारका येथे बांधले जाणार असून त्यावर 107 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

2021 मध्ये कार्यकारी परिषदेने भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचे नाव एका महाविद्यालयाला देण्याचा ठराव मंजूर केला होता. याशिवाय अन्य एका कॉलेज बांधले जाणार आहे. यास कोणते नाव द्यायचे याचा निर्णय घेण्याची जबाबदारी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सिंग यांना स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी आणि सावित्रीबाई फुले या नावांपैकी एका नावाची निवड करायची आहे.

दोन नवीन विद्यापीठे आणि एका नवीन महाविद्यालयाच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पूर्व आणि पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॅम्पस खूप सोयीचे ठरणारे आहे. या भागातील विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासासाठी उत्तर आणि दक्षिण दिल्लीतील कॅम्पसला जावे लागते. (Veer Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.