Sydney Test : निर्णायक सिडनी कसोटीपूर्वी बुमराह, गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात गहन चर्चा

Sydney Test : गंभीर आणि बुमराह यांच्यातही खाजही बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

70
Sydney Test : निर्णायक सिडनी कसोटीपूर्वी बुमराह, गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात गहन चर्चा
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावसकर मालिकेतील निर्णयाक सिडनी कसोटीपूर्वी भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरणच बदलून गेलं आहे. संघ १-२ ने मालिकेत पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत राखून चषक आपल्याकडे राखण्यासाठी भारतीय संघाला सिडनी जिंकावीच लागेल आणि याच गोष्टीवर गंभीरने पत्रकार परिषदेत भर दिला. ‘सिडनी कसोटी कशी जिंकायची ही एकमेव चर्चा सध्या ड्रेसिंग रुममध्ये आहे,’ असं त्याने निक्षून सांगितलं. (Sydney Test)

आणि हे इप्सित साध्य करण्यासाठी गौतम गंभीर कामाला लागलेलाही दिसत आहे. सिडनी मैदानावर भारतीय संघ सराव करत असताना गंभीर एकट्या जसप्रीत बुमराहशी गंभीरपणे चर्चा करताना दिसला. ही चर्चा सुरू असताना विराट कोहली, रोहित शर्मा, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, रविंद्र जाडेजा आणि यशस्वी जयस्वाल हे खेळाडू फुटबॉलचा सामना खेळत होते. तर शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर क्षेत्ररक्षणावर मेहनत घेत होते. (Sydney Test)

(हेही वाचा – Sydney Test : रोहित शर्माला सिडनी कसोटीतून डच्चू, बुमराह संघाचा कर्णधार)

बुमराहबरोबरच्या चर्चेनंतर गंभीर यांनी ड्रेसिंग रुमच्या बंद दरवाज्यांमागे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशीही चर्चा केली. गंभीरने मेलबर्नमधील पराभवानंतर खेळाडूंना सज्जड दम दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावर गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरने पत्रकारांनाही सुनावलं. ‘ड्रेसिंग रुममध्ये मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये झालेलं बोलणं हे ड्रेसिंग रुममध्येच राहिलं पाहिजे. काहीवेळा कानउघडणी करताना अपशब्द वापरावे लागतात. पण, याचा अर्थ संघात एकवाक्यता नाही असं नाही आणि अजूनही ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळीमेळीचंच आहे,’ असं गंभीर म्हणाला होता. (Sydney Test)

बुमराहशी गंभीरने केलेल्या चर्चेतून एक तर्क आपण लावू शकतो. रोहितचा फलंदाजीतील फॉर्म आणि कर्णधार म्हणून त्याने घेतलेले निर्णय यावर टीका झाली आहे. त्यामुळे सिडनी कसोटी रोहितची शेवटची असणार हे गृहित धरून बुमराहकडे गंभीर भावी नेतृत्व म्हणून बघत असल्याचं या चर्चेतून दिसत आहे. तर मेलबर्नमधील पराभवानंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरही सक्रिय झाल्याचं दिसतंय. सिडनी कसोटीबरोबरच भारताच्या पुढील कार्यक्रमाच्या दृष्टीने तिघांची चर्चा सुरू झाल्याचं यातून दिसत आहे. भारताला या मालिकेनंतर चॅम्पियन्स करंडकावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. (Sydney Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.