RR Lakshya Cup : कर्नाळ्यातील लक्ष्य चषकात खेळणार देशातील आघाडीचे रायफल नेमबाज

RR Lakshya Cup : आरआर लक्ष्य चषकात दिव्यांश पन्वर, अर्जुन बबुता यांचा सहभाग.

79
RR Lakshya Cup : कर्नाळ्यातील लक्ष्य चषकात खेळणार देशातील आघाडीचे रायफल नेमबाज
  • ऋजुता लुकतुके

नवीन वर्षी देशांतर्गत स्पर्धांचा हंगामही सुरू झाला असून नेमबाजीतील वर्षातली पहिली स्पर्धा असणार आहे ती आरआर ग्लोबल लक्ष्य चषक स्पर्धा. ही स्पर्धा ४ व ५ जानेवारी २०२५ ला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल, नवी मुंबई इथं अत्याधुनिक नेमबाजीच्या रेंजवर होईल. (RR Lakshya Cup)

राष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील सध्याचे पुरुष व महिला विजेते शाहू माने आणि अनन्या नायडू यंदा या स्पर्धेत खेळणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले दिव्यांश सिंग पंवर, अर्जुन बबुता आणि संदीप सिंग देखील स्पर्धेत सहभागी होतील. भारताच्या सध्याच्या नेमबाजीच्या राष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरुर यांच्या प्रयत्नांनी ही स्पर्धा भरवण्यात येत आहे. (RR Lakshya Cup)

(हेही वाचा – Union Carbide चा विषारी कचरा तब्बल 40 वर्षांनंतर उचलला)

या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे लंडन ऑलिम्पिक २०१२ चे कांस्य पदक विजेते आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी भारतीय संघाचे चे प्रमुख शेफ-दी-मिशन गगन नारंग असतील. (RR Lakshya Cup)

“आरआर लक्ष्य कपमध्ये आमचा उद्देश कौशल्य ओळखणे, उत्कृष्टतेला सन्मान देणे आणि नेमबाजांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी सर्वोच्च व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून, ती मेहनतीचा, समर्पणाचा आणि खेळाडूवृत्तीचा उत्सव आहे,” असं सुमा शिरुर स्पर्धेची घोषणा करताना म्हणाल्या. (RR Lakshya Cup)

(हेही वाचा – National Sports Awards : मनु भाकरसह गुकेशलाही खेलरत्न, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर)

आरआर लक्ष्य कप ही केवळ निमंत्रितांसाठीची राष्ट्रीय स्पर्धा आहे. आणि भारतातील अव्वल २० नेमबाज यात सहभागी होतात. या स्पर्धेचे विशेषत्व म्हणजे येथे पुरुष आणि महिला समान संख्येने शॉट्स घेत स्पर्धा करतात. २००८ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत हा नियम लागू आहे. (RR Lakshya Cup)

ज्युनियर फायनल ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता होईल, तर वरिष्ठ गटाची फायनल ३:३० वाजता होईल. पारितोषिक वितरण सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. (RR Lakshya Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.