पावामध्ये स्टेपलरची पिन सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोर्ट येथे राहणारे निखिल कोचरेकर यांनी खरेदी केलेल्या पावामध्ये चक्क स्टेपलरची पिन सापडली. त्यावेळी कोचरेकर यांनी याविषयी तेथील न्यू एडवर्ड बेकारीच्या (New Edward Bakery) मालकाकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी आधी नकार दिला, त्यानंतर त्यांनी याचा स्वीकार केला.
(हेही वाचा Naxalite Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, 1 जवान शहीद)
निखिल यांनी रविवारी सकाळी नाश्त्यासाठी न्यू एडवर्ड बेकरीमधून (New Edward Bakery) पाव खरेदी केले. त्यातील एक पाव खात असताना त्यात स्टेपलर पिन सापडली. याविषयी निखिल यांनी याविषयी बेकारीच्या मालकाकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी पावामध्ये स्टेपलर पिन आढळल्याचे अमान्य केले, त्यानंतर निखिल यांनी व्हिडीओ दाखवला तसेच हा पाव माझ्या पत्नीकडे होता म्हणून पिन सापडली, जर तो पाव मुलीने खाल्ला असता तर ती पिन पोटात गेली असती तर त्याचे परिणाम वाईट झाले असते, असे सांगितले. त्यावेळी बेकारीच्या (New Edward Bakery) मालकाने चूक मान्य केली, तसेच निखिल यांची क्षमा मागितली. आम्ही कधीच पॅकिंगसाठी स्टेपलरची पिन वापरत नाही. कदाचित ही पिन रॉ मटेरियलमधून आली असेल. मैदा चाळताना ती पिन राहिली असेल आणि ती पावात आली असेल, त्यामुळे आम्ही यापुढे काळजी घेऊ, असे बेकारीच्या मालकाने सांगितले.
Join Our WhatsApp Community