भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व प्रभारी आ.रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ४ जानेवारी २०२४ रोजी वसई परिसरातील उबाठा (Shiv Sena-UBT) आणि बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aaghadi) सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे वसई विरार (Vasai-Virar) परिसरात बविआसोबत उबाठालाही भाजपाने जोरदार धक्का दिल्याची चर्चा आहे. येत्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अशावेळी दोन्ही पक्षातील ३०० कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी पक्षात प्रवेश करणे ही निश्चितच धोक्याची घंटा ठरू शकते. (Vasai-Virar)
( हेही वाचा : आकारी पड जमिनी मूळ मालकांना परत देण्याबाबत उपसभापती डॉ. Neelam Gorhe यांचे मोठे योगदान; शेतकऱ्यांनी मानले आभार)
या भाजपा पक्षप्रवेशावेळी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे (Sneha Pandit) , आमदार तथा भाजपा संघटन पर्व प्रभारी रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी चव्हाण यांनी पक्षात सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. यामध्ये उबाठा रंजित प्रकाश किणी उपविभाग प्रमुख (नायगाव), विभाग प्रमुख नंदकुमार पाटील, प्रविण खंडागळे उपशाखाप्रमुख, हिंदू संगठन वसई पूर्वचे प्रवेश दुबे, बहुजन विकास आघाडीचे मनोज गुप्ता,मिक्की आनंद, दिनेश म्हात्रे, कल्पेश पाटील, प्रमोद रसाल, ज्योती सिंग, कमलेश भोईर यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. (Vasai-Virar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community