- विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडाच्या विविध विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील विखुरलेल्या सदनिका, भूखंडाचे वितरण करतेवेळी ज्या दिवशी सदनिकेचा तथा भूखंडाचा ताबा घेतला आहे, त्या दिवसापासून लाभार्थ्यांना मासिक सेवाशुल्क व मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी, असा धोरणात्मक निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला असून या निर्णयाचा लाभ आगामी सोडतीतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. मागील महिन्यांची थकबाकी असल्यास ती सदनिका/भूखंडाच्या विक्री किंमतीमधील (अनफोरसीन लायबिलिटी, अॅंटीसीपेटेड लायबिलिटी किंवा नफा किंवा स्थान महत्त्व अधिक्य इत्यादी) कुशन मधून मंडळाने अदा करावे. मात्र, त्याचा भार लाभार्थ्यांवर टाकू नये, असा धोरणात्मक निर्णय जयस्वाल यांनी जाहीर केला आहे. (Mhada Lottery)
(हेही वाचा – Ajit Pawar आणि Dhananjay Munde यांच्यामध्ये ४५ मिनिटे खलबतं, पण भेटीचे कारण गुलदस्त्यात)
मुंबई मंडळाच्या विविध वसाहतींमधील विखुरलेल्या सदनिकांचे सेवाशुल्क, मालमत्ता कर इत्यादी बाबींचा समावेश सदनिकांच्या विक्री किंमतीमध्ये करण्याबाबत निर्णय घेण्याकरिता आयोजित बैठकीमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांतील सदनिकांचे तथा भूखंडाचे वाटप सोडत प्रक्रियेद्वारे करण्यात येते. विक्री किंमतीमध्ये सदनिकांचे तथा भूखंडाचे सेवा शुल्क, मालमत्ता कर इत्यादी करांचा समावेश करण्यात येत नाही. सोडती पश्चात काही कारणांमुळे सदनिकांचा तथा भूखंडाचा ताबा विलंबाने होतो. सदनिकेचा तथा भूखंडाचा ताबा देण्यात येईपर्यंत. ही मालमत्ता मंडळाची असते. सदनिकेचा, भूखंडाचा ताबा दिल्यानंतर संबंधित संस्थेद्वारे त्यांच्या प्रलंबित शुल्काची मागणी मंडळांमार्फत करण्यात येते. मंडळाच्या विक्री सोडतीतील विखुरलेल्या सदनिकांच्या लाभार्थ्यांवर प्रकल्प उभारल्यापासून मासिक सेवाशुल्क, मालमत्ता कर आकारणी करणे योग्य नसल्याचे सांगत जयस्वाल पुढे म्हणाले की, विखुरलेली सदनिका,भूखंड हे पूर्णतः मंडळांच्या ताब्यात असल्याने त्याचा भुर्दंड म्हाडा लाभार्थ्यांवर पडू नये. तरी लाभार्थ्यांनी सदनिकेचा तथा भूखंडाचा ताबा ज्या दिवशी घेतला आहे, त्या दिवसापासून लाभार्थ्यांना सेवाशुल्क, मालमत्ता कर इत्यादी लागू करणे उचित राहील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (Mhada Lottery)
(हेही वाचा – Beed Murder : सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांसोबत बैठक, तातडीने कारवाईची मागणी)
यापुढे कार्यकारी अभियंता यांच्याद्वारे सदनिकेची विक्री किंमत निश्चित करताना सदनिकेचे/भूखंडाचे प्रलंबित सर्व शुल्कांचा समावेश विक्री किंमतीमध्ये अंतर्भूत करण्यात यावा. अशा लाभार्थींना सदनिकेचा/भूखंडाचा ताबा देण्यात आलेला आहे व गृहनिर्माण संस्थेद्वारे लाभार्थ्यांकडे सेवाशुल्क इत्यादी करांची मागणी करण्यात येत आहे. तसेच या सर्व शुल्कांचा भरणा संबंधित कार्यकारी अभियंता यांनी परस्पर संस्थेस अदा करावे व याचा खर्च आगामी सोडतीमध्ये प्रस्तावित असलेल्या योजनांवर अधिभार करण्यात यावा. परंतु ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी शुल्कांचा भरणा संस्थेस केला आहे, अशा लाभार्थ्यांना सदरचा ठराव लागू होणार नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, मागील महिन्यांची थकबाकी असल्यास ती सदनिका/भूखंडाच्या विक्री किंमतीमधील (अनफोरसीन लायबिलिटी, अॅंटीसीपेटेड लायबिलिटी किंवा नफा किंवा स्थान महत्त्व अधिक्य इत्यादी) कुशन मधून मंडळाने अदा करावे. मात्र, त्याचा भार लाभार्थ्यांवर टाकू नये, असा धोरणात्मक निर्णय जयस्वाल यांनी जाहीर केला आहे. (Mhada Lottery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community