- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मबईतील हवेची गुणवत्ता आता बहुतांशी सुधारली असून वातावरणीय बदलांमुळे वायू प्रदूषणात वाढ आढळून आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन वायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईतील भायखळा, बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली आहे. (BMC)
(हेही वाचा – म्हाडा वसाहतीतील पुनर्विकसित इमारतींना ओसी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी; MHADA ने आणली विशेष अभय योजना)
मात्र, असे असले तरी, यापुढेही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर महानगरपालिकेची यंत्रणा अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणार आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आवश्यक ती सर्व कार्यवाही बांधकाम प्रकल्पांना, विकासकांना करावीच लागेल. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळून आले आणि वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता केली नाही तर अशा विशिष्ट बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, आवश्कतेनुसार त्या विशिष्ट बांधकाम प्रकल्पावर निर्बंध लादण्यात येईल, असे सुस्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community