- प्रतिनिधी
दहावीच्या सराव परीक्षेच्या वर्गातील आसन व्यवस्थेवरुन हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये वर्गात झालेल्या हाणामारीत हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांने इंग्रजी माध्यमाच्या दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी सायन कोळीवाडा येथील शाळेत घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी हिंदी माध्यमाच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही विद्यार्थ्यांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. शाळेत झालेल्या या गंभीर घटनेमुळे शाळा प्रशासन हादरले असून पालकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Crime)
(हेही वाचा – Goregaon SV Road : गोरेगावमधील एस व्ही रोडच्या रुंदीकरणातील १४ बांधकामांचा अडथळा झाला दूर)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन कोळीवाडा या ठिकाणी असलेल्या हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवार पासून दहावीच्या सराव परीक्षा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेने प्रत्येक वर्गात हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था एकत्र केली होती. एक बेंचवर इंग्रजी आणि हिंदीचे विद्यार्थी बसण्याची व्यवस्था केली होती. सोमवारी सकाळी सराव परीक्षा देण्यासाठी आलेल्या हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी वर्गात एकत्र आले असता हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या चार विद्यार्थ्यांमध्ये आसन व्यवस्थेवरून शाब्दिक वाद झाला. (Crime)
(हेही वाचा – स्वत:च्या अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही Pakistanची प्रथा; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकला झापले)
या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन हिंदी माध्यमातील एका विद्यार्थ्यांने सोबत आणलेला फळ कापण्याच्या चाकूने इंग्रजी माध्यमाच्या दोन विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच अँटॉप हिल पोलिसांनी शाळेत धाव घेऊन तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी हिंदी माध्यमातील दोन विद्यार्थीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी डोंगरी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. चार पैकी तीन विद्यार्थी अँटॉप हिल पोलिसांच्या हद्दीत राहणारे असून एक विद्यार्थी वडाळा टिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community