BMC : मुंबई महापालिकेत सहआयुक्ताच्या ताकदीपुढे सर्व उपायुक्तांनी घातले लोटांगण

7508
BMC : मुंबई महापालिकेत सहआयुक्ताच्या ताकदीपुढे सर्व उपायुक्तांनी घातले लोटांगण
BMC : मुंबई महापालिकेत सहआयुक्ताच्या ताकदीपुढे सर्व उपायुक्तांनी घातले लोटांगण
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेत निवृत्त सहआयुक्त आता आयुक्त कार्यालयातील उपायुक्तपदावरच विशेष कार्य अधिकारी म्हणून विराजमान झाले आहेत. आयुक्त कार्यालयात उपायुक्तांचे एक पद असताना ते उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांमधून न भरता आयुक्तांनी याच पदावर निवृत्त झालेल्या चंद्रशेखर चौरे यांना विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून पुन्हा नियुक्त केले. मात्र, या पदावर ओएसडी म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला बसवता येणार  नाही, आयुक्तांनी हवे हे पद भरून स्वत:साठी ओएसडी म्हणून त्यांची नियुक्ती करावी अशाप्रकारची धारणा आणि मागणी उपायुक्तांची असूनही आयुक्तांनी मात्र त्यांना कुणालाच जुमानले नाही. त्यामुळे सहआयुक्तांच्या ताकदीपुढे महापालिकेचे सर्व उपायुक्तांनी पराभव पत्करुन त्यांच्यासमोर लोटांगण घातले असून आजही महापालिकेत जुन्या सहआयुक्तांच्या लॉबीचेच प्रस्थ असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (BMC)

जुन्या पदावरच सर्व अधिकारासह स्थानापन्न

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात उपायुक्तांचे एक पद असून या पदावर सहआयुक्त चंद्रशेखर चौरे हे मागील काही वर्षांपासून कार्यरत होते. रमेश पवार यांच्या नंतर या पदावर चंद्रशेखर चौरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण नियत वयोमानानुसार मागील १ जानेवारी २०२५ रोजी चौरे हे सेवानिवृत्त झाले. परंतु सेवा निवृत्तीनंतर चौरे यांना त्याच पदावर ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात आले. आजवर ओएसडी हे मार्गदर्शक तथा सल्लागाराच्या भूमिकेत असले तरी आयुक्तांच्या कार्यालयातील नियुक्त ओएसडी हे त्यांच्या जुन्या पदावरच सर्व अधिकारासह स्थानापन्न झाले आहेत. त्यामुळे आजवरच्या ओएसडी नियुक्तीच्या प्रथेलाच प्रथम छेद दिला गेला आहे. (BMC)

(हेही वाचा- Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून बीड आणि परभणी प्रकरणात कुटुंबियांना दिलासा)

सहायक आयुक्त उपायुक्त पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

आयुक्तांच्या कार्यालयातील चौर यांच्या निवृत्तीने रिक्त झालेले पद कार्यरत उपायुक्तांमधील अधिकाऱ्यांमधून भरणे आवश्यक असताना प्रशासनाने त्याच पदावर चौरे यांची ओएसडी म्हणून नियुक्ती केल्याने उपायुक्तांकरता असलेले एक पद या ओएसडीच्या नियुक्तीने झाकले गेले, ज्याठिकाणी उपायुक्तांपैंकी कुणाची वर्णी लागली जावू शकत नाही.   महापालिकेत आधीच सहायक आयुक्तांमधून उपायुक्त म्हणून पदोन्नती मिळण्याच्या मार्गात अनेक अधिकारी असून त्यांना केवळ खाली सहायक आयुक्तपदी अधिकारी नसल्याने बढती दिली जात नाही, (BMC)

उपायुक्तांमध्ये प्रशासनाच्याविरोधात प्रचंड नाराजी

तसेच ज्या उपायुक्तांना बढती दिली, त्यांच्यावर सहायक आयुक्तांच्या पदभारासोबतच उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आधीच उपायुक्तांमध्ये प्रशासनाच्याविरोधात प्रचंड नाराजी असतानाच आता आयुक्तांच्या कार्यालयातील उपायुक्त पदी ओएसडी  म्हणून सेवानिवृत्त सहआयुक्तांची नियुक्ती केल्याने या नाराजीत अजून भर पडलेली पहायला मिळत आहे. (BMC)

(हेही वाचा- Weather Update: घामाच्या धारा लागणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार)

उपायुक्तांमध्ये एकजूट नसल्याने…

चौरे हे सेवानिवृत्तीनंतर त्याच पदावर ओएसडी म्हणून वर्णी लावून घेण्यात यशस्वी ठरले, परंतु याला ठोस आणि ठाम विरोध उपायुक्तांच्या स्तरावर होवू शकला नाही किंबहुना त्यांची एकीची ताकद कुठेच दिसून आली नाही. उपायुक्तांमध्ये एकजूट नसल्याने याचा फायदा महापालिकेतील यापूर्वीच्या म्हणून जुन्या सहआयुक्तांच्या लॉबीने उठवत चौरे यांची खुंटी मजबूत करत त्यांना त्याच पदावर ओएसडी म्हणून बसवण्यास यश मिळवले. (BMC)

आजही जुनी लॉबी आपली ताकद टिकवून

महापालिकेत यापूर्वी निवृत्त झालेले सहआयुक्त यांची एक ताकदवर लॉबी काम करत होती आणि त्यामुळे सहायक आयुक्तांच्या बदल्या कुठे करायच्या? कुणाची वर्णी कुठे लावायची? हे काम या लॉबीकडून होत असे अशी चर्चा महापालिकेत ऐकायला मिळत असे. याच जुन्या सहआयुक्तांपैकी शेवटचे निवृत्त झालेले चंद्रशेखर चौरे असून त्यांना ओएसडी बनवण्यात यासर्वांचा मोठा हातभार असल्याचेही  बोलले जात आहे. त्यामुळे आजही जुनी लॉबी निवृत्त झाली असली तरी आपली ताकद टिकवून असल्याने महापालिकेतील दुसऱ्या फळीतील जे अधिकारी उपायुक्तपदी नियुक्त झाले आहेत, त्यांचा डाळ अजून काही या लॉबीपुढे  शिजत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीपुढे महापालिकेचे विद्यमान उपायुक्त असलेल्या अधिकाऱ्यांना हतबल बनून आयुक्तांनी माथी मारलेल्या ओएसडीला झेलल्याशिवाय पर्यायच नसल्याचे चित्र तरी सध्या दिसून येत असून याविरोधात उपायुक्तांनी आक्रमक पाऊल उचलले ना या विरोधात कोणतीही संघटना न्यायालयात गेली. (BMC)

(हेही वाचा- HMPV Virus बद्दल अफवा पसरवू नका! तज्ज्ञांचे आवाहन)

आयुक्तांच्या कार्यालयातील हे पद आता कायमच निवृत्त अधिकाऱ्यांमधून भरणार?

त्यामुळे चौरे यांचे ओएसडी पद हे आयुक्तांच्या कार्यालयातील उपायुक्तपदी पक्के आणि मजबूत झाले आहे. आता भविष्यात कोणताही आयुक्त आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला किंवा निवृत्त अधिकाऱ्याला या पदावर बसवून कामकाज करून घेऊ शकतो,  त्यामुळे आयुक्तांच्या कार्यालयातील हे पद आता कायमच बाहेरील अधिकाऱ्यांमधून भरले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (BMC)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.