सिंधुदुर्गमधील १५६ जागांवर वक्फ बोर्डाचा दावा; मंत्री Nitesh Rane यांचा धक्कादायक खुलासा

83
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तब्बल १५६ जागांवर ‘वक्फ बोर्डा’ने (Claim of Waqf Board on land at Sindhudurg) दावा केल्याची धक्कादायक माहिती बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उघडकीस आणली आहे. त्यात बहुतांश देवस्थानांच्या जमिनींचा समावेश आहे. याविषयी माहिती देताना बंदरे आणि मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांच्या जमिनींवर ‘वक्फ बोर्ड’ने (Waqf Board) दावा केला आहे. (Nitesh Rane)

आज देवस्थाने, उद्या घरांवर दावा सांगतील

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक खासदार आणि तिन्ही आमदार हिंदुत्ववादी विचारांचे नसते, तर ‘वक्फ बोर्डा’ ने दावा केलेली जागा इतक्यात देऊन टाकली असती. आज आपल्या देवांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील, तर उद्या राहत्या घरांनादेखील सोडणार नाहीत. हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचे षड्यंत्र यामागे आहे. राज्यात आणि देशात आमचे सरकार असेपर्यंत एक इंचही जमीन ‘वक्फ’च्या (‘Waqf) घशात जाऊ देणार नाही. अशा प्रकारचे इस्लामिक अतिक्रमण (Islamic Encroachment) आम्ही सहन करणार नाही. असे विधान बंदरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले.

(हेही वाचा – अजब ‘आजारा’वर गजब चर्चा; Buldhana येथे ३ दिवसातच पडतंय टक्कल!)

नितेश राणे म्हणाले की,  जिल्ह्यातील १५६ ठिकाणी ‘वक्फ बोर्डा’ ने दावा केल्याची यादी माझ्या हाती लागली आहे. असा ‘वक्फ बोर्ड’ कुठल्याही इस्लामी राष्ट्रांमध्ये नाही. मग भारतामध्येच त्याला इतके महत्त्व का?” असा उद्विग्न सवाल राणे यांनी केला. “तुमच्या जमिनीवर हे ‘वक्फ बोर्ड’ वाले फलक लावून जातील, मग कुठल्याही न्यायालयामध्ये जाऊन त्याबाबत संरक्षण मागू शकत नाही.  एवढे अधिकार याआधीच्या सरकारने त्यांना देऊन ठेवले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार जे विधेयक आणू पाहात आहे, त्याला समर्थन देणे गरजेचे आहे,” असे राणे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Athletics Federation President : बहादूर सिंग सागू ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवीन अध्यक्ष, ८ वर्षांनंतर आदील सुमारीवाला पायउतार)

“भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी अशाप्रकारे षड्यंत्र रचले जात आहे. सुदैवाने आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत. आज जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असते, तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जमिनी ‘वक्फ’ला देऊन टाकल्या असत्या. ‘वक्फ’ने जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील आणखी कोणाच्या जमिनी असतील, तर आमच्याशी संपर्क साधावा. कोण कुठल्या कागदावर तुमच्या सह्या घेत आहेत, याबाबत सतर्क रहा. ग्रामपंचायतीत कोणकोणते ठराव होत आहेत, याचीही माहिती घ्या,” असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.