Taj Hotel मध्ये एकाच नंबर प्लेटच्या २ गाड्या; चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती

223
Taj Hotel मध्ये एकाच नंबर प्लेटच्या २ गाड्या; चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
Taj Hotel मध्ये एकाच नंबर प्लेटच्या २ गाड्या; चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती

जगप्रसिद्ध ताज हॉटेलच्या (Taj Hotel) परिसरात एकाच नंबर प्लेटच्या (same number plate) दोन कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. कुलाबा (Colaba) पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. कारच्या चालकांची चौकशी सुरु आहे. ताज हॉटेल (Taj Hotel) आणि परिसर मुंबईतील अतिसंवेदनशील भाग समजला जातो. त्या ठिकाणी असा प्रकार घडल्यानं पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

हेही वाचा-काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार; Congress मध्ये नेतृत्व बदलावर संभ्रम

समान क्रमांकाच्या समान कंपनीच्या दोन गाड्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गाडया पोलीस ठाण्यात आणून याचा तपास केला आहे. यात बनावट नंबर प्लेट बनवून एकप्रकारे फसवणूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात गाडीचे मूळ मालक असलेल्या साकीर अली यांनी तक्रार दिली असून याबाबत आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. (Taj Hotel)

हेही वाचा-BMC : मुंबई महापालिकेत सहआयुक्ताच्या ताकदीपुढे सर्व उपायुक्तांनी घातले लोटांगण

साकीर आली यांनी या प्रकरणावर सविस्तर माहिती दिली आहे. “मी नरीमन पॉईंट येथे कार चालवत होतो. मात्र गेल्या आठ महिन्यापासून माझ्याच नंबर असलेली सेम गाडी रस्त्यावर चालत असल्याचे मला समजले. त्याचे सर्व फाईन मला येत होते. एक दोन तीन वेळेला मी ते फाईन भरले पण सातत्याने असे व्हायला लागल्यानंतर मी आरटीओ मध्ये देखील तक्रार केली होती मात्र आरटीओने यावर कोणतेही प्रकारे कारवाई केली नाही.” असं ते म्हणाले. (Taj Hotel)

हेही वाचा-Athletics Federation President : बहादूर सिंग सागू ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवीन अध्यक्ष, ८ वर्षांनंतर आदील सुमारीवाला पायउतार

“आज मी एका प्रवाशांना ताज हॉटेल येथे सोडण्यात आलो असताना माझ्या शेजारी माझ्याच नंबरची माझ्याच मॉडेलची असलेली एक गाडी मला दिसली. त्यानंतर मी त्या गाडीची चौकशी करण्यासाठी त्याच्याजवळ गेलो असता चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूचे टॅक्सी चालक आणि पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.” अशी माहिती साकीर अली यांनी दिली. (Taj Hotel)

हेही वाचा-CIDCO Lottery 2024: अखेर सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर; अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख

आरोपीचे कारचे हफ्ते थकल्यामुळं त्याने गाडीचा नंबर बदलला असल्याचे पोलिस चौकशीत सांगितले. त्याचा कारचा नंबर MH 01 EE 2383 असा आहे. मात्र मात्र कर्जाचे हप्ते थकल्यामुळे MH 01 EE 2388 असा नंबर बदलून घेतल्याचे तो सांगत आहे. (Taj Hotel)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.