-
ऋजुता लुकतुके
पहिल्या वहिल्या ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाचा कार्यक्रम आता जाहीर झाला आहे. १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष व महिलांचे ३९ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमुळे खो-खोला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळणार आहे. आणि महाराष्ट्राचा हा खेळ जागतिक होणार आहे. पुरुष गटाचा सलामीचा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात होणार आहे तर महिलांचा सलामीचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सांगणार आहे. (Kho – Kho World Cup)
१३ जानेवारीला रंगणार्या उद्घाटन सोहळ्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यातील सलामीचा सामना रात्री ८:३० वाजता होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरीलस्टार स्पोर्ट्स १ HD आणि स्टार स्पोर्ट्स फर्स्ट वाहिन्यांवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल, तर दूरदर्शन प्रादेशिक स्तरावर देशभरात कव्हरेज देणार आहे.डिस्ने+ हॉटस्टार डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रवाहाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. (Kho – Kho World Cup)
(हेही वाचा- काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार; Congress मध्ये नेतृत्व बदलावर संभ्रम)
पुरुष गट : संघ विभाजन आणि महत्त्वाचे सामने
पुरुष गटात २० संघ चार गटांमध्ये विभागले गेले आहेत:
गट अ : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
गट ब : दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
गट क : बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
गट ड : इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया
(हेही वाचा- सिंधुदुर्गमधील १५६ जागांवर वक्फ बोर्डाचा दावा; मंत्री Nitesh Rane यांचा धक्कादायक खुलासा)
महिला गट: संघ विभाजन आणि महत्त्वाचे सामने
महिला गटात १९ संघ चार गटांमध्ये विभागले गेले आहेत:
गट अ : भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
गट ब : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
गट क : नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
गट ड : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया
महिला गटातील सलामीचा सामना १४ जानेवारी रोजी सकाळी ११:४५ वाजता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता दक्षिण कोरियाविरुद्ध होईल. (Kho – Kho World Cup)
गटातील साखळी फेरीचे सामने १६ जानेवारीपर्यंत खेळले जातील. तर बाद फेरीचे म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचे सामने १७ जानेवारीपासून सुरू होईल आणि महिलांचा अंतिम सामना १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता खेळवला जाईल तर पुरुषांचा अंतिम सामना रात्री ८:१५ वाजता रंगेल. (Kho – Kho World Cup)
(हेही वाचा- Health : २०२५ मध्ये स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य द्या)
प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. (Kho – Kho World Cup)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community