Uttar Pradesh परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना भाविकांशी चांगले वर्तन करण्याचे प्रशिक्षण

53

प्रयागराज येथे होणार असलेल्या महाकुंभपर्वात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येणार आहेत. त्यांच्याशी कसे वागावे ?, याचे प्रशिक्षण पोलिसांनंतर उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांनाही देण्यात येत आहे. महाकुंभपर्वासाठी (Maha Kumbh Mela 2025) येणार्‍या भाविकांची यात्रा अविस्मरणीय होण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासह भाविकांच्या सेवेसाठी असणारे परिवहन विभागातील (Transport Department) सर्व चालक आणि वाहक हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असू नयेत, या उद्देशाने सर्व चालक आणि वाहन यांचे पोलीस व्हेरिफिकेशन (पडताळणी) करण्यात आले आहे.

(हेही वाचा – १४ जानेवारीपासून डॉ. व्ही. नारायणन ISRO चे नवे प्रमुख)

जर कुठल्या चालक किंवा वाहकाने कुठल्याही प्रवाशाशी चुकीचे वर्तन केल्यास त्याच्याविरुद्ध परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व चालक आणि वाहक यांना त्यांच्या सेवेकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचेही धडे दिले जात आहेत.

कौशल आणि वर्तणुकीचे प्रशिक्षण

महाकुंभ सारख्या मोठ्या कार्यक्रमात येणारे सर्व श्रद्धाळूंनी उत्तरप्रदेशची सकारात्मक प्रतिमा घेऊन जावी, असा सरकारचा उद्देश आहे. याच अनुषंगाने पोलीस कर्मचारी ते रोडवेज कर्मचारी अशा सर्वच जणांना कौशल्य आणि वर्तणुकीचे प्रशिक्षण दिले जात आहे. परिवहन विभाग देखील आपल्या कर्मचाऱ्यांचे वर्तणुकीचे प्रशिक्षण देत आहे, कारण भाविक मोठ्या संख्येने लोक बसच्या माध्यमातून प्रयागराजला येतील, असा अंदाज आहे.

चुकीचे वर्तन केल्यास कारवाई

प्रयागराज परिक्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक एम.के. त्रिवेदी यांनी सांगितले की, प्रयागराजमध्ये बस चालवणारे सर्व चालक आणि परिचालकांचे पोलीस सत्यापन करून घेतले आहे. यात प्रयागराजहून चालणाऱ्या परिवहन विभागाच्या बससोबतच इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या बसांचे चालक आणि परिचालक देखील समाविष्ट आहेत. (Uttar Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.