मुंबईमध्ये एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचा शिरकाव झाला आहे. पवईमध्ये हिरानंदानी रुग्णालयात (Hiranandani Hospital) आज (८ जानेवारी) मुंबईतील ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा पहिला रूग्ण अढळला असून, सहा महिन्यांच्या बाळाला याची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (HMPV)
हेही वाचा-१४ जानेवारीपासून डॉ. व्ही. नारायणन ISRO चे नवे प्रमुख
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासनाला १ जानेवारी रोजी एचएमपीव्ही (HMPV) रुग्णाबाबत कल्पना दिली होती. परंतु परळ येथील बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप असा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
हेही वाचा-Taj Hotel मध्ये एकाच नंबर प्लेटच्या २ गाड्या; चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
देशातील एकूण रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 2 रुग्ण आढळल्याच्या एक दिवस आधी, व्हायरसचे एकूण 6 रुग्ण नोंदवले गेले, ज्यात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण समाविष्ट आहेत. त्यापैकी बहुतेक मुले आहेत. (HMPV)
हेही वाचा-Mahakumbh 2025 साठी पोलिसांचे सायबर पेट्रोलिंग सुरू; 78 संशयास्पद वेबसाइट आणि 4 जणांना अटक
मुंबईतील या विषाणूची ही पहिलीच घटना आहे. मंगळवारी, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 2 रुग्ण नोंदवले गेले. येथे 13 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा संक्रमित आढळले. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. उपचारानंतर त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे. (HMPV)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community