kalyan station : कल्याण जंक्शन वरून पहिली रेल्वे कधी धावली होती? पाहुण्यांसाठी दिली गेली मेजवानी!

31
kalyan station : कल्याण जंक्शन वरून पहिली रेल्वे कधी धावली होती? पाहुण्यांसाठी दिली गेली मेजवानी!

१६ एप्रिल १८५३ साली बोरी बंदर-तन्नाह मार्ग सुरू होण्याआधीच इतर अनेक मार्ग तयार करण्याची प्रगती आधीच सुरू होती. तन्नाहच्या पलीकडच्या एक्सटेंशन मार्गासाठी तन्ना खाडी आणि गोदाडुंगूर या दोन टेकड्यांमध्ये पारसीक पॉइंटपर्यंत सर्व मार्गाने नेव्हिगेशन करणं गरजेचं होतं. त्यासाठी एप्रिल १८५१ साली विल्यम व्हायथेस आणि जॅक्सन या कंत्राटदारांना हा विभाग विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. त्याबद्दलच्या कराराची किंमत ₹३,४१,४०७ एवढी होती. हे डेव्हलपमेंटचं काम डिसेंबर १८५३ सालापर्यंत पूर्ण झालं.

कल्याणच्या पुढे असलेला भाग मे १८५२ साली जमशेटजी दोराबजी टाटा यांना डेव्हलप करण्यासाठी देण्यात आला. त्या कराराची किंमत ₹१,६५,८५१ एवढी होती. ते काम जमशेटजी दोराबजी टाटा यांनी एप्रिल १८५४ सालापर्यंत पूर्ण केलं आणि कल्याणची रेल्वे लाईन १ मे १८५४ साली सुरू झाली. (kalyan station)

(हेही वाचा – काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार; Congress मध्ये नेतृत्व बदलावर संभ्रम)

१ मे १८५४ या दिवशी रेल्वेने बोरी बंदरहून कल्याणचा पहिला प्रवास संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार होता. या प्रवासात तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉर्ड एल्फिन्स्टनसोबत सुमारे २५० पाहुणे होते. त्यावेळी पिण्याचं पाणी भरण्यासाठी भांडूप स्थानकावर थांबून प्रवास पुढे निघाला. ती ट्रेन अखेरीस संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कल्याणला पोहोचली. तिथे ट्रेनच्या स्वागतासाठी बँड, सजावटीचे तंबू उभारलेले होते.

तसंच पाहुण्यांना रात्रीच्या जेवणाची मेजवानी देण्यात आली होती. सर्वांत शेवटी फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्सवाची सांगता झाली. त्यानंतर ती ट्रेन रात्री ९ वाजता तिच्या सुरुवातीच्या स्थानाकाकडे जाण्यासाठी परत फिरली. कल्याण जंक्शन हे मुंबई उपनगरीय रेल्वे लाईनच्या मध्यवर्ती मार्गावरचं एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या उपनगरी मुंबई विभागाच्या उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व मार्गांच्या जंक्शनवर आहे. (kalyan station)

(हेही वाचा – सिंधुदुर्गमधील १५६ जागांवर वक्फ बोर्डाचा दावा; मंत्री Nitesh Rane यांचा धक्कादायक खुलासा)

कल्याण जंक्शन हे भारतातल्या सर्वात व्यग्र असलेल्या १० रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. भारतातल्या सर्व गाड्यांसाठी कल्याण जंक्शन हे महत्त्वाचं स्थानक आहे. तरी नागपूर दुरांतो आणि डेक्कन क्वीन या दोन गाड्या कल्याण स्थानकावर थांबत नाहीत.

अहमदनगर रेल्वे स्थानकाचा सर्वात जुना आणि महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प म्हणजे कल्याण-अहमदनगर रेल्वे प्रकल्प होय! हा प्रकल्प ब्रिटिश राजवटीपासून नियोजनाच्या टप्प्यात होता. त्याचा उल्लेख तिसरा घाट प्रकल्प म्हणून करण्यात आला होता. या प्रकल्पाचं सर्वेक्षण १९७३, २०००, २००६, २०१४ मध्ये झालं होतं. हा प्रकल्प २०१० साली गुलाबी पुस्तकात होता. पण हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. (kalyan station)

(हेही वाचा – Health : २०२५ मध्‍ये स्‍वत:च्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या)

या प्रकल्पाची संरेखन लांबी १८४ किलोमीटर एवढी होती. हा मराठवाडा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी सर्वात लहान मार्ग असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासमोर असलेलं आव्हान म्हणजे माळशेज घाटातून १८.९६ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणं हे माळशेज घाट विभागासमोर मोठं आव्हान आहे. तरी माळशेज कृती समिती कल्याण-अहमदनगर रेल्वे प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा करत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या कल्याण-मुरबाड विभागाचं सर्वेक्षण सुरू आहे.

कसारा आणि खोपोलीकडे जाणाऱ्या जलद गाड्यांसाठी कल्याण जंक्शन हे शेवटचं स्थानक आहे. या स्थानकावर जलद गाड्या थांबतात. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा किंवा खोपोली पर्यंत धावणाऱ्या सर्व सेवा कल्याणच्या पलीकडे असलेल्या सर्व थांब्यांवर थांबतात. त्याचप्रमाणे जेव्हा गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावत असतात, त्यावेळी कल्याण जंक्शन हे पहिलं जलद स्थानक असतं. (kalyan station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.