Meenatai Thackeray Flower Market : व्यापाऱ्यांवरील कारवाईमुळे दोन्ही शिवसेनेत शाब्दिक चकमक

83
Meenatai Thackeray Flower Market : व्यापाऱ्यांवरील कारवाईमुळे दोन्ही शिवसेनेत शाब्दिक चकमक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावाने उभ्या असलेल्या दादरमधील स्व माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडईमध्ये दोन्ही शिवसेनेचे शिलेदार भिडले. या मंडईत व्यापार करणाऱ्या मराठी व्यापाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असल्याने माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी अधिकाऱ्यांना सज्जद दम देत बाजूच्या आमदाराचे ऐकून काय कारवाई करता असा सवाल केला. यानंतर माहीमचे आमदार महेश सावंत यानी याठिकाणी जात निवडणुकीतील पराभव पचवू न शकलेल्या “असमाधानी” पुत्राची बाष्कळ बडबड… असल्याची टीका करत आता दोन महिने आराम करा आणि पुन्हा राजकारणात उतरा अशा शब्दांत टीका केली. (Meenatai Thackeray Flower Market)

(हेही वाचा – CIDCO Lottery 2024: अखेर सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर; अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख)

दादरमधील स्व माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडईमधील काही मराठी फुल व्यापारी हे मनसे संबंधित असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. याचा जाब शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी अधिकाऱ्यांना जावून विचारला. इथे काही मराठी फुल व्यापारी फक्त मनसे सोबत संबंधित आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे. रस्त्यावर हफ्ते देतात म्हणून अनधिकृत फेरीवाले चालतात, परंतु मराठी फुलमार्केटमध्ये उबाठाच्या दलालांना काही व्यापारी हफ्ते देत नाहीत म्हणून त्या व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो, असे समाधान सरवणकर सांगितले. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केला केला असून त्यात त्यांनी मुस्लिम मतांच्या जीवावर निवडून आलेला एक आमदार आज मराठी व्यापारी यांचा त्रास देत आहे. फक्त हफ्ते नाही मिळत म्हणून जर मराठी माणसाला त्रास दिला, तर माहीम दर्गा मस्जिद बाहेर उबाठा चा आशीर्वादाने सुरु असलेला एकही धंदा सुरु ठेवायला देणार नाही असा इशारा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावत दिला आहे. मीनाताई ठाकरे फुल मार्केटचा परिसर हा वडाळा विधानसभा क्षेत्रात मोडत असून तरीही दुसऱ्याच्या मतदारसंघात माहिमचे उबाठा शिवसेनेचे आमदार महेश सावंत हे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. (Meenatai Thackeray Flower Market)

(हेही वाचा – सिंधुदुर्गमधील १५६ जागांवर वक्फ बोर्डाचा दावा; मंत्री Nitesh Rane यांचा धक्कादायक खुलासा)

समाधान सरवणकर यांच्या इशाऱ्यानंतर आमदार महेश सावंत यांनी मीनाताई ठाकरे फुल मार्केटला भेट देत माजी आमदार पुत्राचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पराभव सहन न झाल्याने माजी आमदार पुत्र अशाप्रकारची बडबड करत आहे. येथील मंडईतील राजकीय बॅनरबाजी विरोधात महापालिका अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई यांना असह्य झाल्याने माझ्यावर खोटेनाटे आरोप करत फालतू स्टंट करणाऱ्या माजी आमदार पुत्राने लक्षात ठेवावं…. दादरकर जनता सुज्ञ आहे. असे सांगत महेश सावंत यांनी अधिकाऱ्यांशी बोलतांना आपला व्हिडीओ व्हायरल केला आहे. या माजी आमदार पुत्राला मागील वेळेस पाडले असते, माझ्यासमोर तो केवळ १८५ मतांनी निवडून आला होता. या मंडईतील कुणालाही त्रास नसून जर माझे नाव याठिकाणी घेतले जात असेल आणि हा माझा मतदार संघ नाही म्हणून सांगितले जात असेल तर कामगार नगरमध्ये कुणी हस्तक्षेप केला होता असाही सवाल करत पराभव झाल्यामुळे दोन महिने आराम करा आणि मग राजकारणात उतरा असाही खोचक सल्ला सावंत यांनी सरवणकर यांना दिला आहे. (Meenatai Thackeray Flower Market)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.