- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांच्याकडून कचरा करणे, थुंकणे असा प्रकार होत असल्याने यावर प्रतिबंध करून या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शल (Cleanup Marshal) नियुक्त केले जात आहेत. तब्बल १२ क्लीनअप मार्शलची नेमणूक कूपर रुग्णालयात केली जाणार असून त्यामुळे जर या रुग्णालयात जात असाल तर आणि कचरा टाकताना आणि थुकंताना आपण पकडले गेल्यास आपल्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
(हेही वाचा – Taj Hotel मध्ये एकाच नंबर प्लेटच्या २ गाड्या; चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती)
विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात जनतेकडून कचरा टाकला जात असल्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे या उपद्रवाच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत आहे. त्याअनुषंगाने रुग्णालयात स्वच्छता आणि आरोग्यदायी स्वच्छतापूर्ण वातावरण राहावे, आरोग्याला हानिकारक व जैविक कचरा व्यवस्थापन करणे, रुग्णालय प्रशासनाने धोरण आणि कार्यपद्धतीचे पालन, उत्कृष्ट रूग्ण सेवा प्रदान करणे आणि रुग्णालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी पाळीनिहाय १२ क्लीनअप मार्शलची (Cleanup Marshal) नियुक्ती करण्याची मागणी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त यांच्याकडे केले होते.
(हेही वाचा – सिंधुदुर्गमधील १५६ जागांवर वक्फ बोर्डाचा दावा; मंत्री Nitesh Rane यांचा धक्कादायक खुलासा)
या पत्राच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी आपणास पुनःश्च आदेशित करण्यात येते की, कूपर रुग्णालयात क्लीनअप मार्शलची (Cleanup Marshal) नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिष्ठाता यांना अति महत्त्वाच्या व्यक्ती सामाजिक संस्था आणि जनतेकडून खात्यातील कचऱ्यामुळे होणाऱ्या उपद्रवाच्या तक्रारी वारंवार सादर केल्या जातात. त्या अनुषंगाने रुग्णालयात स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतापूर्ण वातावरण जतन करण्यासाठी पाळीनिहाय १२ क्लीनअप मार्शल (Cleanup Marshal) यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी असे निर्देश दिघावकर यांनी दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community