ICC Test Ranking : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताची क्रमवारीत घसरण, तिसऱ्या स्थानावर गच्छंती

ICC Test Ranking : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतूनही भारतीय संघ बाद झाला.

41
ICC Test Ranking : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताची क्रमवारीत घसरण, तिसऱ्या स्थानावर गच्छंती
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात पराभव होत असताना दक्षिण आफ्रिकन संघाने अलीकडेच आपल्या दोन्ही मालिका जिंकल्या आहेत. बांगलादेश पाठोपाठ त्यांनी पाकिस्तानवरही त्यांनी २-० ने मात दिली आहे. त्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे आणि याचाच अर्थ भारतीय संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आफ्रिकेनं सेंच्युरियन कसोटीत पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला. तर भारताला ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर हा बदल झाला आहे. (ICC Test Ranking)

भारतीय संघ खरंतर गेली काही वर्षं आयसीसी क्रमवारीवर वर्चस्व ठेवून होता. मात्र गेल्या काही सामन्यातील पराभवांमुळे टीम इंडियाची क्रमवारी घसरली. भारतीय संघ आता १०९ गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर होता. मालिका संपल्यानंतरही भारताने हे स्थान राखलं होतं, पण दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करताच त्यांनी भारतावर कुरघोडी केली आहे. ११२ गुणांसह आफ्रिकन संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या संघाचे १२६ गुण आहेत. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – Uttar Pradesh परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना भाविकांशी चांगले वर्तन करण्याचे प्रशिक्षण)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघाला केवळ क्रमवारीतच फटका बसला नाही. तर भारतीय संघ आयसीसी टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ११ जूनपासून लॉर्ड्सवर अंतिम फेरीचा सामना होणार आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. (ICC Test Ranking)

भारतीय संघाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. भारत २०२१ आणि २०२३ मध्ये फायनल खेळला होता. जिथे न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला. (ICC Test Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.