-
ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि मंगळवारी त्यांनी भारताला एक खुशखबर दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड क्षेत्रात कंपनी भारतात २५,७२२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारत दौऱ्यात सध्या नाडेला बंगळुरू इथं आहेत आणि तिथूनच त्यांनी एक ट्विट केलं आहे. भारतात मायक्रोसॉफ्टचं मुख्यालय हैद्राबाद इथं आहे आणि तिथेच कंपनीचं एक डेटा सेंटरही आहे. कंपनीचे भारतात १०,००० कर्मचारी आहेत. सध्याच्या सेवांचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. (Narendra Modi-Satya Nadella Meet)
सत्या नडेला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली
(हेही वाचा – Meenatai Thackeray Flower Market : व्यापाऱ्यांवरील कारवाईमुळे दोन्ही शिवसेनेत शाब्दिक चकमक)
Thrilled to announce our new investments in AI infrastructure and skilling in India to help accelerate the country’s AI transformation. https://t.co/e2y7hc6Sko
— Satya Nadella (@satyanadella) January 7, 2025
भारताला AI-प्रथम राष्ट्र बनवण्यासाठी मदत करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे. नडेला यांनी यापूर्वीच भारतातील या गुंतणुकीचे संकेत दिले होते. एआय क्षेत्रात भारतात विकासाच्या खूप संधी आहेत, असं विधान पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेत केलं होतं. (Narendra Modi-Satya Nadella Meet)
भारताच्या टेकविकासात मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही सहभागी व्हायचं आहे आणि हातभार लावायचा आहे, असंही त्यांनी अलीकडेच बोलून दाखवलं होतं.
(हेही वाचा – Torres चा भांडाफोड कसा झाला, काय होती टोरेसची मोडस ऑपरेंडी?)
Thank you, PM @narendramodi ji for your leadership. Excited to build on our commitment to making India AI-first and work together on our continued expansion in the country to ensure every Indian benefits from this AI platform shift. pic.twitter.com/SjfiTnVUjl
— Satya Nadella (@satyanadella) January 6, 2025
एक दिवसापूर्वी सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटवरशेअर केला आहे. फोटो शेअर करताना नडेला यांनी लिहिले होते, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद.
भारताला एआय क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि देशात आम्ही विस्तार आणि गुंतवणूक करत राहू. (Narendra Modi-Satya Nadella Meet)