Beed Murder Case : सुरेश धस आणि अजित पवार यांच्यात बैठकांचे सत्र; पडद्यामागे नक्की घडतंय काय ?

62
Beed Murder Case : सुरेश धस आणि अजित पवार यांच्यात बैठकांचे सत्र; पडद्यामागे नक्की घडतंय काय ?
  • प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठा राडा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. भाजपा आमदार सुरेश धस यांनी याच मुद्द्यावरून मोठं रान उठवलंय. अशातच बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराडवर सातत्याने लक्ष केलं जात असताना आता अजित पवार आणि धस यांच्यातील बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (Beed Murder Case)

बीड जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या हत्याकांडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच माजी मंत्री सुरेश धस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सलग दोन दिवस झालेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण आले आहे. या भेटीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्या वळणावर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. (Beed Murder Case)

(हेही वाचा – Uttar Pradesh परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना भाविकांशी चांगले वर्तन करण्याचे प्रशिक्षण)

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत हत्याकांडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा झाली. तसेच, या प्रकरणाचा कोणाला राजकीय फायदा कसा साधता येईल, यावरही विचारमंथन झाल्याचे बोलले जात आहे. बीडमधील राजकारणात सुरेश धस यांची महत्त्वाची भूमिका असल्याने तसेच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच मंत्री असलेले सुरेश धस यांचे अजित पवार यांच्याबरोबर जुने संबंध देखील आहेत. (Beed Murder Case)

सुरेश धस यांनी गेल्या काही काळात बीड भाजपामधील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात बीडचे राजकारण खराब करण्यामध्ये मुंडे बंधू भगिनींचा हात असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाच्या बैठकीत त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, धस जरी भेटीमध्ये जिल्हा बँक आणि तत्सम विषय सांगत असतील तरी त्यात मात्र काहीच तथ्य नसल्याचे सांगतात. (Beed Murder Case)

(हेही वाचा – Taj Hotel मध्ये एकाच नंबर प्लेटच्या २ गाड्या; चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती)

भेटीनंतर अजित पवार यांनी ही चर्चा जिल्ह्यातील विकासकामांवर केंद्रित असल्याचे सांगितले, मात्र हत्याकांडावर विचारणा टाळली. दुसरीकडे, सुरेश धस यांनी भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (Beed Murder Case)

बीड हत्याकांडानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, धस यापूर्वी मंत्री देखील राहून गेले आहेत. परंतु सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकली नाही. त्यामुळेच मुंडे बंडू-भगिनींवरती याचा वचपा काढण्याचा हा प्रकार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे येणाऱ्या काळात याचा परिणाम बीडमधील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडू शकतो. (Beed Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.