झटपट पैसा कमविण्याच्या नादात सव्वा लाख गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस (Torres) या विदेशी कंपनीने सर्व खापर संचालक, सीईओ आणि सीए या भारतीयांवर फोडले आहे. एवढे सर्व घडून देखील टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांची अजून देखील दिशाभूल करण्याचा प्रकार समोर आला आहे.या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मेसेज पाठवून ‘काळजी करू नका,आशा सोडू नका,तुमच्या सर्वांसाठी आणि टोरेस टीमसाठी ही कठीण वेळ आहे, तुमची सर्व खाती सक्रिय केली जातील’ असे मेसेज पाठवले जात असून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.
(हेही वाचा Torres कंपनीमुळे सव्वा लाख गुंतवणूकदारांचे निघाले दिवाळे; तिघांना अटक; मुख्य आरोपी युक्रेनमध्ये पळाले)
Join Our WhatsApp Community