केंद्र सरकारने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. त्यामुळे त्याचे यापुढेही भारताच वास्तव्य राहणार आहे. त्यांना मायदेशात पाठवावे, अशी मागणी बांगलादेश सरकारने केली होती. मात्र अप्रत्यक्षपणे भारताने ही मागणी आता फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा Torres चा भांडाफोड कसा झाला, काय होती टोरेसची मोडस ऑपरेंडी?)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे प्रत्यार्पण केले जाणार नाही. भारत सरकारकडून बांगलादेश सरकारला पाठवण्यात आलेल्या अप्रत्यक्ष संदेशात या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भारत सरकारने शेख हसीनाचा पासपोर्ट रद्द करूनही त्यांचा व्हिसा वाढवला आहे. गृह मंत्रालयाने शेख हसीना यांना भारतात राहण्यासाठी व्हिसाची मुदत वाढवली आहे. बांगलादेशात दीर्घकाळ चाललेल्या देशव्यापी निदर्शनांनंतर शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात वास्तव्याला आल्या. बांगलादेश सरकारने अलीकडेच शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे केली होती. अशा परिस्थितीत भारताने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द करून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
Join Our WhatsApp Community