- प्रतिनिधी
शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्या. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करून भेसळ तात्काळ रोखा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांना पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते.
(हेही वाचा – Dr. Bhau Daji Lad Museum : इतिहास, वारसा समजण्यासाठी संग्रहालयांची भूमिका मोलाची)
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत रक्त दान मोहीम, अवयव दान, स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व प्रतिबंधात्मक उपाय योजना, मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करा. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा असे मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा – Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील प्राचीन चार शिळांना तडे; भक्तांमध्ये चिंता)
दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
अन्न व औषध प्रशासन विभागात ऍलोपॅथी औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी, फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी, मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community