Dhananjay Munde यांच्या पाठोपाठ Pankaja Munde देखील अडचणीत येणार ?

जमीन हडपल्याचा आरोप

101
Dhananjay Munde यांच्या पाठोपाठ Pankaja Munde देखील अडचणीत येणार ?
  • प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहकारी अडकल्याने अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली जमीन धमकी देऊन हडपल्याचा आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला. वाल्मीक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी धमकावून जमीन हडप करण्याचा आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी हा आरोप सारंगी महाजन यांनी केला असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात लवकरच त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटणार आहेत.

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्या खासदारांशी कोण करत आहे संपर्क ?)

साडेतीन कोटींची जमीन फक्त २१ लाखांत

परळीमध्ये प्रवीण महाजन यांची जमीन होती. सदरची जमीन विकण्यासाठी सारंगी महाजन यांच्यावर दबाव टाकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाल्मीक कराड यांच्या साथीदारांनी धमक्या देऊन सदरचा प्रकार केला असल्याचे सारंगी महाजन यांनी एबीपी माझा समोर येऊन सांगितले. कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या गेल्या आणि साडेतीन कोटींची जमीन मात्र २१ लाखांत घेण्यात आली. सारंगी महाजन म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडे याने धाक दाखवून जमिनीची रजिस्ट्री केली. जोपर्यंत सह्या करत नाही तोपर्यंत परळीतून जाऊ दिले जाणार नाही अशी त्याने धमकी दिली. महाजन यांनी केलेले हे आरोप जरी जुने असले तरी यामध्ये वाल्मीक कराड यांच्या नावामुळे आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत भर पडली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.