Crime : चोवीस रुपयांच्या व्यवहारावरून उघडकीस आला हत्येचा गुन्हा

117

चोवीस रुपयांच्या जी-पे व्यवहारामुळे रेल्वे पोलिसांना (जीआरपी) पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अंमलदार यांनी गुगल पे वरून केलेल्या शेवटच्या व्यवहारामुळे पोलिसांनी मारेकऱ्याचा (Crime) माग काढून मृत पोलीस अंमलदार यांची पत्नी, तिचा प्रियकर यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल विजय चव्हाण (५२) असे मृताचे नाव आहे. विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. चव्हाण हे कुटूंबासह नवी मुंबईत राहत होते, १ जानेवारी रोजी चव्हाण यांचा मृतदेह रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आढळला होता. वाशी रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वाशीतील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात चव्हाण यांची गळा आवळून हत्या (Crime) करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मारेकऱ्यांनी हत्या करून अपघात दाखविण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाती मृत्यू झाल्याचे भासवले.

पोलीस तपास पथकाने हत्येचा तपास सुरू करून रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले मात्र मारेकऱ्यांचा कुठलाही मागमूस लागत नव्हता, अखेर पोलिसांनी मृत विजय चव्हाण यांचा मोबाईल फोनमधील शेवटचा कॉल तपासून देखील त्यात अनोळखी किंवा संशयास्पद क्रमांक आढळुन आला नाही. दरम्यान पोलिसांनी चव्हाण यांचे गुगल पे खाते तपासले असता त्यांना गुगल पे चे शेवटचे ट्रांझेक्शन २४ रुपयांचे आढळून आले, चव्हाण यांनी २४ रुपयांचे ट्रांझेक्शन तपासले असता चव्हाण यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री एका भुर्जीपावच्या गाडीवरून भुर्जीपाव खरेदी केली होती. पोलिसांनी भुर्जीपावची गाडी शोधून काढत चव्हाण सोबत कोण कोण होते याची माहिती मिळवली असता चव्हाण सोबत दोन इसम होते अशी माहिती मिळाली.

(हेही वाचा वक्फच्या नावाने बळकावलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर गरिबांसाठी घरे बांधणार; CM Yogi Adityanath यांची घोषणा)

पोलिसांनी स्टॉल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले आणि मृतकासोबत असलेले पुरुष सापडले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना जेरबंद केले. पोलिसांना कळले की, कारमध्ये गळा दाबल्यानंतर, आरोपींनी ट्रान्स-हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली स्थानकांदरम्यानच्या रुळांजवळील झुडपात मृतदेह नेला. पहिली लोकल ट्रेन येईपर्यंत ते जवळपास चार तास तिथे लपून राहिले. ट्रेनजवळ येताच त्यांनी चव्हाण यांचा मृतदेह रुळांवर ढकलून दिला आणि रेल्वेने अपघाती मृत्यू झाल्यासारखे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेच्या मोटरमनने वेळीच मृतदेहाची दखल घेत रेल्वे नियंत्रणाला सूचना देत ट्रेन थांबवली. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत, असे डीसीपी पाटील यांनी सांगितले. (Crime)

या दोघांच्या चौकशीत विजय चव्हाण यांच्या हत्येचा कट त्यांची पत्नी पूजा चव्हाण हिने तिचा चुलत भाऊ आणि त्याचे मित्र असलेल्या तिच्या प्रियकरासह रचला होता, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भूषण निंबा ब्राह्मणे (२९) असून त्याच्यासोबत मृताच्या पत्नीचे संबंध होते आणि ब्राह्मणेचे मित्र प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण (२३) आणि प्रवीण आबा पानपाटील (२१) यांचा समावेश होता. गुन्ह्यात तपासात आम्हाला आढळून आले की, ३१ डिसेंबरच्या रात्री प्रकाश चव्हाण याने विजय चव्हाण यांना त्यांच्या योजनेनुसार दारू पाजली. त्यानंतर ब्राह्मणे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मृताचा गळा आवळून खून (Crime) केला. त्याचा मृत्यू रेल्वे अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह चालत्या लोकल ट्रेनसमोर ढकलला,” असे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे ब्राह्मणेसोबत विवाहबाह्य संबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ब्राह्मणेसोबत राहण्यासाठी तिला तिच्या पतीला संपवायचे होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.