Central Railway च्या प्रवाशांसाठी बुधवार ठरला त्रासदायक; ०७ लोकल रद्द 

73

असंख्य मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन (Local Railway) असलेल्या अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या फैऱ्यांचे सध्या तीन – तेरा वाजले आहेत. मध्य रेल्वेच्या (Central Railway) पाच साध्या आणि दोन एसी लोकल बुधवार, ०८ जानेवारी रोजी सकाळी अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मेल- एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंगच्या ३ घटनांमुळे आधीच लोकलच्या वेळापत्रकात बदल झाला होता. त्यातच काही मेल-एक्स्प्रेस धुक्यामुळे मुंबईत उशिरा पोहोचल्यामुळे त्याचीही वाहतूक विस्कळीत होण्यात भर पडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Central Railway)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण (kalyan) दरम्यानचे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सोमवारपासून बिघडलेले आहे. दुपारच्या सत्रात अप आणि डाऊन दिशेच्या जलद तसेच धीम्या मार्गावरील गाड्या १५ ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागले.

(हेही वाचा – ना ग्रामपंचायत ना महापालिका State Govt नागरी सुविधांसाठी ‘या’ क्षेत्राचा घेणार शोध)

मध्य रेल्वे नेहमीच लेट असते, यामध्ये काहीच वेगळं नाही. प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी रेल्वेने कायमस्वरूपीच्या उपाययोजना करायला हव्यात. मध्य रेल्वेवर नवीन डीआरएम आले असून वेळापत्रकामध्ये सुधारणा करण्यासाठी ते काहीतरी योजना आखतील, अशी अपेक्षा आहे. असे मत रेल यात्री परिषद (Rail Passenger Council) अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा – रुग्ण केंद्रीत आरोग्य व्यवस्था निर्माण करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)

रात्री २ एसी सेवा रद्द

मध्य रेल्वेवर बुधवारी दिवसभर लोकल सेवा रद्द (Cancel local service) करण्याचे सत्र सुरूच होते.

रात्री ९:४२ ची कल्याण – सीएसएमटी सुपर फास्ट एसी लोकल आणि ११:१९ ची कल्याण-ठाणे धीमी एसी लोकल (AC Local) रद्द करण्यात आली. त्यामुळे बुधवार हा मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला.

हेही पाहा –

https://youtu.be/d2iMoogdw8I?si=f_ZlVXOU9Bja5vav

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.