Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित

Fastest Ball in Cricket History : भारताचा एकमेव गोलंदाज या यादीत आहे. पण, तो मयांक यादव नाही

32
Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित
Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिकेत दुसऱ्या ॲडलेड कसोटीत मोहम्मद शमीचा एक चेंडू ताशी १८६ किमी वेगाने पडल्याचं स्पीडोमीटर दाखवत होता. त्यानंतर काही काळ खळबळ माजली. पण, काही वेळातच स्पीडोमीटरने चूक केल्याचं सगळ्यांना ध्यानात आलं. सिराजचा तो चेंडू जगातील वेगवान अशा पहिल्या दहांतही नव्हता. या मालिकेत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं असतं, तरी थरकाप उडवणारे ताशी १५५ किमी वेगाने आलेले चेंडू पाहायला मिळाले नाहीत. (Fastest Ball in Cricket History)

(हेही वाचा- अजित पवार- अमित शहा यांची भेट; Dhananjay Munde यांच्यावर दबाव वाढला ?)

मिचेल स्टार्क आणि जसप्रीत बुमराह ही ताशी १४० ते १४८ किमी वेगाने गोलंदाजी करत होते. पण, सिराजच्या त्या अंदाज चुकलेल्या चेंडूनंतर पुन्हा एकदा क्रिकेटमधील वेगवान चेंडूची चर्चा सुरू झाली. पाकिस्तानचा हॅरिस रौफने गेल्यावर्षी एकदिवसीय विश्वचषकात ताशी १५८ किमींच्या वेगाने चेंडू टाकला होता. गेल्या दोन वर्षांतील हा सगळ्यात वेगवान चेंडू आहे. पण, क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली तरी तो पहिल्या दहांतही नाही. (Fastest Ball in Cricket History)

क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम रौफचा आदर्श खेळाडू शोएब अख्तरच्याच नावावर आहे. रावळपिंडी एक्स्पेस नावाने प्रसिद्ध झालेला शोएब सातत्याने ताशी १६० किमींपेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकू शकत असे. तो खेळत असताना ब्रेट ली, तो आणि शॉन टेट यांच्यात वेगवान चेंडूसाठी स्पर्धा होती. (Fastest Ball in Cricket History)

(हेही वाचा- ना ग्रामपंचायत ना महापालिका State Govt नागरी सुविधांसाठी ‘या’ क्षेत्राचा घेणार शोध)

शोएबचा वेगवान चेंडू नेमका किती वेगवान होता आणि सर्वात वेगवान गोलंदाजांच्या यादीत असलेला एकमेव भारतीय कोण हे जाणून घेऊया…  (Fastest Ball in Cricket History)

हे चेंडू पाहताना फक्त वेग हाच निकष धरला आहे. चेंडू एकदिवसीय क्रिकेटमधील आहे की कसोटी किंवा टी-२० हे पाहिलेलं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान चेंडूची शक्यता जास्त असते. (Fastest Ball in Cricket History)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडूचा मान पाकिस्तानच्या शोएब अख्तरकडे जातो. त्याने सातत्याने ताशी १६१ किमीच्या वेगाने गोलंदाजी केली आहे. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिथल्याच वातावरणात खेळताना तर त्याची गोलंदाजी चांगलीच बहरली होती. (Fastest Ball in Cricket History)

(हेही वाचा- रुग्ण केंद्रीत आरोग्य व्यवस्था निर्माण करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)

विशेष म्हणजे शोएब खेळत असतानाच त्याला ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली आणि न्यूझीलंडचा शॉन टेट यांची तीव्र स्पर्धा होती. ऑस्ट्रेलियातील मालिकेत शोएब आणि ब्रेट ली यांच्यात नेहमीच स्पर्धा होती. आणि वेगवान चेंडूचा विक्रम एकमेकांकडे फिरतही होता. पण, शेवटी शोएबनं २००३ च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत १६१.३ किमी वेगाने चेंडू टाकला. आणि आजही हा विक्रम कायम आहे. (Fastest Ball in Cricket History)

आता पाहूया वेगवान चेंडूचा विक्रम नावावर असलेले पहिले दहा फलंदाज आणि यात कोण भारतीय आहे.

१. शोएब अख्तर – ताशी १६१.३ किमी

२. ब्रेट ली – ताशी १६१.१ किमी 

३. शॉन टेट – ताशी १६१ किमी

४. जेफ थॉमसन – ताशी १६०.६ कमी

५. मिशेल स्टार्क – ताशी १६०.४ किमी 

६. अँडी रॉबर्ट्स – ताशी १५९.७ किमी

७. फिडेल एडवर्ड्स – ताशी १५७.७ किमी

८. मिशेल जॉनसन – ताशी १५६.८ किमी

९. मोहम्मद शमी – ताशी १५६.४ किमी

१०. शेन बाँड – ताशी १५६.४ किमी 

(हेही वाचा- Fraud : थेट सीबीआयच्या नावाने फसवणूक, 42 लाखांचा गंडा; अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद)

मिचेल स्टार्क भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा गोलंदाज होता. पण, यावेळी त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. (Fastest Ball in Cricket History)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.