Gautam Adani House : गौतम अदानींचं अहमदाबादेतील घर आहे एका गावाइतकं मोठं

Gautam Adani House : मिठाखाली क्रॉसिंग, नवरंगपुरा हा पत्ता ऐकल्यावरच सगळ्यांचे डोळे दिपतात

38
Gautam Adani House : गौतम अदानींचं अहमदाबादेतील घर आहे एका गावाइतकं मोठं
Gautam Adani House : गौतम अदानींचं अहमदाबादेतील घर आहे एका गावाइतकं मोठं
  • ऋजुता लुकतुके

१९६२ साली गुजरातमध्येच जन्मलेले गौतम अदानी हे त्यांच्या घरातील पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. म्हणजे अदानी समुहाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. ऐन विशीत चांगल्या नोकरीच्या आमिषाने ते मुंबईत आले. पण, इथे येतानाही त्यांना मनात ठाऊक होतं, पुढे काय करायचंय! लहानपणी कांडला बंदरात शाळेची सहल गेलेली तेव्हाच तिथल्या जहाजांनी त्यांना आकर्षित केलं होतं. ते मुंबईत आले आणि हिऱ्यांच्या आयात – निर्यातीचा व्यापार त्यांनी जवळून बघितला. आणि काही वर्षांच्या अनुभवानंतर ते लगेचच अहमदाबादला परतले. डोक्यात कल्पना पक्की होती. त्यांनी अदानी एक्पोर्ट्स नावाने पहिली छोटी कंपनी स्थापन केली. त्यांना आयात – निर्यातीचा व्यवसाय करायचा होता. (Gautam Adani House)

(हेही वाचा- Diljit Dosanjh Net Worth : रुपये ३,००० पहिला पगार ते खाजगी जेट आणि १७२ कोटी रुपयांची संपत्ती, असा आहे दलजित दुसांजचा प्रवास )

१९८८ साली म्हणजे गौतम अदानी २६ वर्षांचे असताना त्यांनी केलेली सुरुवात ३७ वर्षांनंतर अदानी साम्राज्यात बदलली आहेत. त्यांच्या समुहात आता सात नोंदणीकृत कंपन्या आहेत. आणि इतरही अनेक कंपन्या आहेत. या घडीला ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, त्यांचं साम्राज्य ६०६० कोटी रुपयांच्या घरात आहे. ते भारत आणि आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचं राहणीमानही त्यांच्या या साम्राज्याला साजेसंच आहे. (Gautam Adani House)

अहमदाबादला त्यांचं वास्तव्य असतं. आणि तिथे नवरंगपुरा या श्रीमंत भागात अदानींचं स्वत:चं घर आहे. घर म्हणण्यापेक्षा अदानी शांतीवन नावाचं एक छोटं गावच तिथे वसलं आहे, इतकं हे घर मोठं आहे. शांतीवन, मिठाखाली क्रॉसिंग, नवरंगपुरा, अहमदाबाद – ८ हा पत्ता गुजरातमध्ये कुणाला माहीत नाही, असं होत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव या घराविषयी फारशी माहिती बाहेर कधी उघड करण्यात आलेली नाही. पण, या घरात अदानींचा पाहुणचार ज्यांनी ज्यांनी घेतलाय, त्यांनी घराचं राजेशाही वर्णन केलं आहे. (Gautam Adani House)

(हेही वाचा- Tirupati stampede : तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर)

घराभोवती मोठ्या बागा आणि बगिचे आहेत. आणि घरातील एका बाजूच्या भिंती या पूर्णपणे काचेच्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे घरात सकाळच्या वेळी बाहेरचा प्रकाश खेळता राहील याची सोय सर्वच खोल्यांमध्ये केलेली आहे. घरातील डायनिंग रुमची चर्चा सगळेच करतात. कारण, भारतातील सगळ्यात मोठं हे डायनिंग टेबल असावं असा अंदाज आहे. आणि त्याभोवतीच्या खुर्च्याही राजेशाही आहेत. घराभोवतीच्या बागेत राष्ट्रपती भवनच्या धर्तीवर वेगवेगळ्या बागा आणि कारंजी बसवण्यात आली आहेत. तर जुन्या काळातील राजवाड्यांना शोभेल असा जलतरण तलाव इथं आहे. (Gautam Adani House)

अहमदाबादमधील या घराबरोबरच अदानी कुटुंबीयांचं दिल्लीतील घरही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. भगवानदास रस्त्यावरील हे घर थेट ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं आहे. आणि त्याचा तो चेहरामोहरा मुद्दाम तसाच ठेवण्यात आला आहे. इथं अनेकदा दिल्लीतील आपल्या मित्रांबरोबर अदानी पार्टी करताना दिसतात. या घराची किंमत ही ४०० कोटींच्या वर आहे. (Gautam Adani House)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.