Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अख्खीच्या अख्खी दुबईला हलवणार? पाकिस्तानची तयारी अपूर्णच 

52
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अख्खीच्या अख्खी दुबईला हलवणार? पाकिस्तानची तयारी अपूर्णच 
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अख्खीच्या अख्खी दुबईला हलवणार? पाकिस्तानची तयारी अपूर्णच 
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक होणार की नाही, याविषयीची अनिश्चितता काही आठवड्यांपूर्वी संपली. आणि त्यानंतर सगळे वाद संपले असं वाटत असतानाच, आयसीसीसमोर आता नवीन समस्या उद्भवली आहे. आयसीसीचे पदाधिकारी पाकिस्तानमधील अपुऱ्या तयारीमुळे नाराज असल्याचं बोललं जातंय. स्पर्धेला फक्त ४० दिवस उरलेले असताना लाहोर आणि कराचीतील स्टेडिअमचं नुतनीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे संतप्त आयसीसीने पाकिस्तानला इशारा दिला आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- मुंबईत लवकरच ‘केबल कार’ धावणार; Nitin Gadkari यांची मान्यता)

आयसीसीच्या ताज्या अहवालात, स्पर्धेच्या तीनही ठिकाणी (रावळपिंडी, कराची लाहोर) इथं तयारी खेदजनक आहे, असं म्हटलं आहे. ‘तीनही मैदानांमधील परिस्थिती खेदजनक आहे. एकही स्टेडिअम सध्या तयार नाही. नुतनीकरणाचं काम नाही तर तिथे बांधकाम सुरू आहे. बसायची व्यवस्था, फ्लड लाईट अशी कुठलीच सोय सध्या तिथे पूर्ण नाही. अगदी मैदानावरील आऊटफिल्ड आणि खेळपट्टीही तयार नाही,’ असं आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं टाईम्स समुहाच्या अहवालात म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)

एखाद्या ठिकाणी सामने होणार असतील तर त्यासाठी आयसीसीचे काही निकष आहेत. खेळाडूंसाठीची ड्रेसिंग रुम कशी हवी, मैदानात कुठल्या सोयी हव्यात. महत्त्वाचं म्हणजे खेळपट्टी कशी हवी, याची काही मार्गदर्शक तत्त्वं आहेत. पण, पाकिस्तानमध्ये याची कसलीच तयारी अजून झालेली नाही. त्यामुळे कामाचं विश्लेषण तरी काय करणार अशी परिस्थिती आहे. या प्रकाराची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. आणि पुढील आठवड्यात आयसीसीचे स्पर्धा अधिकारी तीनही मैदानांची पाहणी करणार आहेत. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Swami Govind Dev Giri Maharaj यांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन)

‘हे वेगळं सांगायला नको की, अशा अर्धवट तयार असलेल्या ठिकाणी आयसीसीचे सामने खेळवले जाऊ शकत नाहीत. इथे काहीच तयार नाहीए. पुढील आठवड्यात स्पष्टता येईल,’ असं आयसीसीचे अधिकारी सध्या म्हणाले आहेत. पण, परिस्थिती बिकट असेल तर चॅम्पियन्स करंडकाचे सर्वच सामने दुबई किंवा युएईमध्येच दुबईसह आबूधाबी आणि शारजाला हलवले जाऊ शकतात. (Champions Trophy 2025)

दरम्यान पाकिस्तानने मात्र काही दिवसांत तिथे होणारी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिरंगी मालिका लाहोर आणि कराचीला हलवली आहे. आधी ही मालिका मुलतानला होणार होती. पण, चॅम्पियन्स करंडकासारखी मोठी स्पर्धा होण्यापूर्वी लहोर आणि कराचीतील मैदानांची चाचणी व्हावी असा पाकिस्तान मंडळाचा विचार आहे. म्हणजेच तिथलं नुतनीकरण वेळेत पूर्ण करण्याची पाकिस्तानची तयारी आहे. या गोष्टी आता पुढच्या आठवड्यातच स्पष्ट होतील. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.