CIDCO घरांचे दर ऐकताच नागरिक संतापले; अर्ज मागे घेण्यास सुरुवात

151
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. नागरी व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) च्या कोकण विभागातील (Konkan Division CIDCO) घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कोकण विभागातील या निवासी प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी अर्ज करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. प्रत्यक्षात सिडकोने समाजातील अल्प उत्पन्न गटासाठी घरेही बांधली आहेत. या घरांची किंमत 25 लाख ते 97 लाख रुपयांपर्यंत आहे. तळोजा, नवी मुंबई खारघर परिसरात सिडकोचे हे गृहप्रकल्प उपलब्ध असतील. ही घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव आहेत. सिडकोने जाहीर केलेल्या घरांच्या किमती (CIDCO House Prices) अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरांवर विरजण पडल्याचा सूर ग्राहकांत उमटला आहे. (CIDCO)

गेल्यावर्षी ११ ऑक्टोबर रोजी सिडकोने माझे पसंतीचे सिडको घर या योजनेंतर्गत (Majhya Pasantiche Cidco Ghar Yoajana) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार घरांची योजना जाहीर केली होती. यात तळोजा, खारघर,  बामणडोंगरी, खारकोपर, कळंबोळी, पनवेल आणि वाशी येथील गृह प्रकल्पांतील घरांचा समावेश आहे. घराच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Gautam Adani House : गौतम अदानींचं अहमदाबादेतील घर आहे एका गावाइतकं मोठं)

ग्राहकांच्या मनात संभ्रम

घराच्या नोंदणीसाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. १० जानेवारीपर्यंत ती आहे. मात्र, या संपूर्ण कालावधीत घरांच्या किमती जाहीर  केल्या नव्हत्या. नेमके कोणत्या प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा, याबाबत अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सिडको घरांच्या किमती कधी जाहीर करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्याने शेवटच्या टप्प्यात अर्ज नोंदणी करताना ग्राहकांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अख्खीच्या अख्खी दुबईला हलवणार? पाकिस्तानची तयारी अपूर्णच )

तळोजातील घरे स्वस्त, खारघरमधील महाग
  • २६ हजार घरांपैकी सर्वाधिक घरे तळोजा नोड येथे आहेत. या विभागातील घरांच्या किमती २५ लाखांपासून ४६ लाखांपर्यंत ठेवल्या आहेत. सर्वांत कमी दर तळोजा सेक्टर २८ येथील घरांचे असून येथे २५ लाखांपर्यंत घर उपलब्ध केले आहे.
  • तर खारघर नोडमध्ये तीन ठिकाणच्या घरांचा या योजनेत समावेश केला आहे. यापैकी सेक्टर २ ए येथील घरांच्या किमती सर्वाधिक म्हणजेच ९७ लाख इतक्या आहेत. त्यापाठोपाठ वाशीतील ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या घराची किंमत ७४ लाख इतकी आहे.

    वाटलं तर फेरविचार करु : संजय शिरसाट

    सामाजिक न्याय मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.  सिडकोनं लॉटरी काढलेली त्यात लोकेशन आहेत.  काही प्राईम आहेत, स्टेशन जवळील काही आहेत. काही ठिकाणी रेट कमी आहेत. काही ठिकाणी किंमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, असं संजय शिरसाट म्हणाले.  आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही, यासंदर्भात वाटलं तर फेरविचार करु, असंही त्यांनी म्हटलं. बिल्डर हा एरीया बिल्टअप एरिया देतो आम्ही कार्पेट एरिया देतो, संजय शिरसाट म्हणाले.

    हेही पाहा –

    https://youtu.be/d2iMoogdw8I?si=f_ZlVXOU9Bja5vav

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.