Vijay Hazare ODI Tournament : प्रसिध कृष्णा, देवदत्त पड्डिकल, वॉशिंग्टन सुंदर विजय हजारे स्पर्धेसाठी उपलब्ध

Vijay Hazare ODI Tournament : विजय हजारे स्पर्धेची बाद फेरी गुरुवारी सुरू होत आहे.

37
Vijay Hazare ODI Tournament : प्रसिध कृष्णा, देवदत्त पड्डिकल, वॉशिंग्टन सुंदर विजय हजारे स्पर्धेसाठी उपलब्ध
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर चषकाच्या अपयशी सांगतेनंतर भारतीय संघ भारतात परतला आहे आणि संघातील खेळाडू आता एकदिवसीय आणि टी-२० हंगामाला सामोरं जाण्यासाठी सिद्ध होत आहेत. दरम्यान, प्रसिध कृष्णा, देवदत्त पड्डिकल आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू विजय हजारे स्पर्धेत खेळणार आहेत. के. एल. राहुलही ऑस्ट्रेलियातून परतला आहे. पण, तो विजय हजारे स्पर्धेत खेळणार नाहीए. दुसरीकडे रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तिथे राहुल खेळण्याची शक्यता आहे. (Vijay Hazare ODI Tournament)

ऑस्ट्रेलियात वॉशिंग्टन सुंदर ३ कसोटी सामने खेळला. यात त्याने एका अर्धशतकासह ११४ धावा केल्या. गोलंदाजीची फारशी संधी त्याला मिळाली नाही. त्याने ३७ षटकांत ३ बळी घेतले. आता तामिळनाडूचा संघ उपान्त्य फेरीत पोहोचला तर सुंदर विजय हजारे स्पर्धा खेळणार आहे. (Vijay Hazare ODI Tournament)

(हेही वाचा – Dadar Railway स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, मला…)

प्रसिध कृष्णा मालिकेत एकमेव सिडनी कसोटी खेळला आणि यात दोन्ही डावांत त्याने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर देवदत्त पड्डिकलला पर्थमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि यात त्याने दोन्ही डावांत १ आणि २५ अशा धावा केल्या. पण, २४ वर्षीय पड्डिकलने ऑस्ट्रेलियाच्या ए संघाबरोबरच्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. तर रणजी हंगामातही त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. (Vijay Hazare ODI Tournament)

प्रसिध आणि पड्डिकल हे दोघंही १० जानेवारीपासून कर्नाटक संघात सहभागी होतील. कर्नाटकची उपउपान्त्य फेरीतील लढत बडोद्यात होणार आहे आणि हा सामना दोघंही खेळतील. नितिश कुमार रेड्डी बुधवारी ऑस्ट्रेलियातून परतला आहे. पण, त्याचा आंध्रप्रदेश संघ बाद फेरीत पोहोचलेला नाही. त्यामुळे तो विजय हजारे स्पर्धेत खेळणार नाही. पण, रणजीच्या दुसऱ्या टप्प्यात तो आंध्रकडून खेळणार आहे. अलीकडेच भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट गांभीर्याने घ्यावं असा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियातून खेळाडू बुधवारी भारतात परतले आहेत. (Vijay Hazare ODI Tournament)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.