पोलिसांना Google Map ने आसामऐवजी नेले नागालँडला; स्थानिकांनी घुसखोर समजून केला हल्ला

85
पोलिसांना Google Map ने आसामऐवजी नेले नागालँडला; स्थानिकांनी घुसखोर समजून केला हल्ला
पोलिसांना Google Map ने आसामऐवजी नेले नागालँडला; स्थानिकांनी घुसखोर समजून केला हल्ला

गुगल मॅपवर (Google Map) आंधळेपणाने विश्वास ठेवणे योग्य नाही. काहीवेळा काही कारणांमुळे नकाशा चुकीचा मार्ग दाखवू शकतो. अशी बरीच प्रकरणे आतापर्यंत समोर आलेली आहेत. आसामच्या (Assam) जोरहाट पोलिसांच्या 16 सदस्यांचे पथक एका आरोपीला पकडण्यासाठी गुगल मॅपच्या (Google Map) निर्देशानुसार जात होते. पण मॅपने तो रस्ता चुकवला आणि पोलिस नागालँडच्या (Nagaland) मोकोकचुंग जिल्ह्यात पोहोचले. येथील लोकांनी पोलिस दलाला घुसखोर समजून त्यांच्यावर हल्ला केला. या पोलीसंना रात्रभर कैद करून ठेवण्यात आले.

हेही वाचा-राज्यात लवकरच वन स्टेट, वन रजिस्ट्रेशनची संकल्पना राबविण्यात येणार; CM Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय

वास्तविक हे सर्व घडले ते गुगल मॅपमुळे (Google Map) . पोलिसांचे पथक ज्या ठिकाणी पोहोचले तो नागालँडमधील चहाचा बगिचा होता, मात्र गुगलने तो आसाममधील असल्याचे दाखवले होते. जोरहाट पोलिसांना याची माहिती मिळताच मोकोकचुंग एसपीची मदत घेण्यात आली. ज्यानंतर या लोकांच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक पथक पाठवले. नागालँडच्या लोकांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी जखमींसह 5 जणांची सुटका केली, तर उर्वरित 11 लोकांना रात्रभर कैद करून दुसऱ्या दिवशी सोडून दिले.

हेही वाचा-Swami Govind Dev Giri Maharaj यांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन

स्थानिक लोक आसाम पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रे बाळगणारे गुंड मानत होते. कारण त्यापैकी फक्त तीन जण गणवेशात होते आणि बाकीचे साधारण ड्रेसमध्ये होते. त्यामुळेही संभ्रम निर्माण झाला. त्यांनी पथकावरही हल्ला केला, त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. हे संपूर्ण पोलिस पथक बुधवारी (८ जाने.) पुन्हा जोरहाटला पोहोचू शकले. (Google Map)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.