Yogi government ने मागवला १९७८ च्या संभल दंगलीचा अहवाल; दंगलीत २४ हिंदू कुटुंबांना जिवंत जाळले…

59
Yogi government ने मागवला १९७८ च्या संभल दंगलीचा अहवाल; दंगलीत २४ हिंदू कुटुंबांना जिवंत जाळले...
Yogi government ने मागवला १९७८ च्या संभल दंगलीचा अहवाल; दंगलीत २४ हिंदू कुटुंबांना जिवंत जाळले...

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने उत्तर प्रदेशातील संभल येथे १९७८ साली झालेल्या दंगलीची माहिती मागितली आहे. उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्य श्रीचंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून हे निर्देश देण्यात आले आहेत. सुमारे ४७ वर्षांपूर्वी, होळीनंतर २९ मार्च रोजी ही दंगल सुरू झाली. यात १८४ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ३० दिवसांसाठी कर्फ्यू लावण्यात आला. (Yogi government)

( हेही वाचा : Fake Income Tax Officer: आयकर अधिकाऱ्याच्या नावे 40 जणांना लुटले, 2 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

सुरुवातीला काही वृत्तसंस्थेच्या हवाल्याने, ४७ वर्षांनंतर राज्य सरकारने १९७८ च्या दंगलीची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते. पण संभलचे पोलिस अधीक्षक केके बिश्नोई (KK Bishnoi) यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. त्यांनी माहिती दिली आहे की, दि. १७ डिसेंबर रोजी विधान परिषद सदस्य श्रीचंद्र शर्मा (Srichandra Sharma) यांनी दिलेल्या पत्रानंतर सरकारने अहवाल मागितला आहे. त्यात म्हटले आहे की, १९७८ च्या दंगलींबाबत जी काही माहिती उपलब्ध आहे. ती उपलब्ध करून दिली पाहिजे. ही माहिती संकलित केली जात आहे आणि नंतर ती सरकारला उपलब्ध करून दिली जाईल. (Yogi government)

दि. ८ जानेवारी २०२५ रोजी, मुरादाबादचे आयुक्त अंजनेय सिंह यांनी संभल जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया यांना या दंगलीशी संबंधित सर्व नोंदी सोपविण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांच्या तक्रारींवरून अनेक जुन्या प्रकरणांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. आयुक्त अंजनेय सिंह यांनीही यासंदर्भात बैठक बोलावली आहे. यापूर्वी ७ जानेवारी रोजी, संभलचे एसपी (पोलीस अधीक्षक) केके बिश्नोई यांनी डीएम पेन्सिया यांना पत्र लिहून कळवले होते की, उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्य श्रीचंद्र शर्मा यांनी १९७८ च्या दंगलींची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे उपसचिव आणि पोलिस अधीक्षक (मानव हक्क) यांच्याकडून पत्र मिळाल्याचा उल्लेख शर्मा यांनी केला होता. गृह विभागाचे उपसचिव सतेंद्र प्रताप सिंह यांनी या संदर्भात एका आठवड्यात अहवाल मागितला आहे. (Yogi government)

मुळात संभलला दंगलीचा मोठा इतिहास आहे. या दंगलींमुळे संभल नगरपालिका क्षेत्रातून हिंदूंनी हळूहळू पलायन केले. स्वातंत्र्याच्या वेळी संभल नगरपालिका क्षेत्रात हिंदूंची लोकसंख्या ४५ टक्के होती, जी आता १५-२०% पर्यंत कमी झाली आहे. त्यावेळी मुस्लिमांची संख्या ५५% होती. आज ती ८०-८५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. प्रशासनाने या दंगलींबाबत अंतर्गत अहवालही तयार केला आहे. यावरून असे दिसून येते की, सर्वात मोठी दंगल १९७८ मध्ये संभलमध्ये झाली होती. या दंगलीनंतर, खग्गुसराय येथे राहणारे सुमारे १०० हिंदू कुटुंबे हा परिसर सोडून गेले. (Yogi government)

हिंदू शिक्षिकेच्या मुलीवर बलात्कार, पत्नीचे अपहरण

या दंगलीच्या वेळी, एका हिंदू शिक्षकाच्या मुलीचे आणि पत्नीचे मंझर शफीने अपहरण केले. ही दंगल भडकवण्यात शफीचीही मोठी भूमिका होती. बलात्कारानंतर हिंदू शिक्षिकेच्या मुलीची सुटका झाली. त्याच्या पत्नीला हिंदूंनी वाचवले. आज या शिक्षकाचे कुटुंब संभलमध्ये राहत नाही.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.