जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट्सची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. हेनले आणि पार्टनर्स, जी एक प्रतिष्ठित संस्था आहे, दरवर्षी या पासपोर्ट रँकिंगची घोषणा करते. यामध्ये देशाच्या पासपोर्टची (Passport) ताकद आणि त्याच्या नागरिकांना मिळणारे व्हिसा-मुक्त प्रवासाचे (Visa-free travel) फायदे यावर आधारित क्रमवारी दिली जाते. ज्या देशांच्या पासपोर्ट्सची रँकिंग (Passport Ranking) अधिक आहे, त्यांच्या नागरिकांना अधिक जागांवर व्हिसा (Visa) लागू न होण्याचा फायदा मिळतो. यामुळे, पासपोर्ट्सची ताकद हे देशांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे एक महत्त्वाचे मापदंड ठरले आहे. या यादीत पाकिस्तानची वाईट अवस्था आहे. येमेनसह ते १०३ व्या क्रमांकावर आहे. येमेनमध्ये गृह सुद्ध सुरू आहे. पाकिस्तानचे रँकिंग उत्तर कोरियापेक्षाही वाईट आहे. (Passport)
(हेही वाचा – Governor Nominated 12 MLC प्रकरणावरील उबाठाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)
जगात सर्वोत्तम ‘सिंगापूर’चा पासपोर्ट
२०२५ च्या पहिल्या सहामाहीसाठी सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी (List of passport) जाहीर करण्यात आली असून सिंगापूरने पहिला क्रमांक मिळवला आहे. सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वोत्तम (Singapore’s best passport in the world) मानला गेला आहे कारण या पासपोर्टधारकांना १९५ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. हा सन्मान सिंगापूरच्या मजबूत राजनैतिक संबंधांचे आणि जागतिक स्तरावर नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या प्रवासाच्या प्रचंड सोयीचे प्रतीक आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपानचा असून जपानी नागरिकांना १९३ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवासाची मुभा आहे. त्यापाठोपाठ दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि फिनलंड हे देश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. या देशांचे पासपोर्टधारक १९२ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांची प्रवाससुविधा अधिक सुलभ आणि प्रभावी ठरते.
The 2025 Henley Passport Index (@HenleyPartners), which ranks all the world’s 199 passports according to the number of destinations they can access visa-free, has been revealed. pic.twitter.com/g2QWlOFmxj
— IATA (@IATA) January 8, 2025
या वर्षी भारताचे रँकिंग घसरले
या वर्षी भारताचे रँकिंगही ५ स्थानांनी घसरले आहे. या यादीत भारताला ८५ वे (Indian Passport Ranking) स्थान मिळाले आहे. तर गेल्या वर्षी भारत ८० व्या स्थानावर होते. २०२३ मध्ये भारताचा क्रमांक ८४, २०२२ मध्ये ८३, २०२१ मध्ये ९०, २०२० मध्ये ८२ आणि २०१९ मध्येही ८२ होता.
(हेही वाचा – दिल्लीत आप-काँग्रेस आमनेसामने लढणार; Omar Abdullah म्हणाले, इंडी आघाडी बरखास्त करा…)
या वर्षीच्या रँकिंगनुसार, भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसाशिवाय ५७ देशांमध्ये प्रवास करता येतो. या देशांमध्ये अंगोला, भूतान, बोलिव्हिया, फिजी, हैती, कझाकस्तान, केनिया, मॉरिशस, कतार, श्रीलंका इत्यादींचा समावेश आहे. तर या यादीत पाकिस्तान १०३ आणि अफगाणिस्तान १०६, बांग्लादेश १००, श्रीलंका ९६, म्यानमार ९४, भूतान ९० स्थानावर आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community