Uttarakhand मधील हरिद्वारनजीकच्या बेकायदेशीर मशिदीला सील

46
Uttarakhand मधील हरिद्वारनजीकच्या बेकायदेशीर मशिदीला सील
Uttarakhand मधील हरिद्वारनजीकच्या बेकायदेशीर मशिदीला सील

उत्तराखंडमधील (Uttarakhand) हरिद्वारनजीक (Haridwar) जमलापूर (Jamlapur) कलानमध्ये बेकायदेशीररित्या मशिदीचे बांधकाम केले जात होते. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जमलापूर कलानमधील सराय मार्गावर अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी न घेताच बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम करण्यात आले होते.

( हेही वाचा : fortis hospital kalyan mumbai : कल्याणमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मिळतात पुष्कळ वैद्यकीय सुविधा!

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर मशिद ज्या जमिनीवर उभारण्यात आली आहे. ती जमीन बेकायदेशीररित्या बळकावण्यात आली आहे. जमिनीचे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याने त्या बांधकामाचे अवैधरित्या इमारतीमध्ये रुपांतर करण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कोणत्याही कागदपत्रांची तपासणी झाली नव्हती. मात्र नंतर अवैधरित्या घाईघाईने मशीद बांधण्यात आली.

हरिद्वार रुरकी विकास प्राधिकरणातील बेकायदेशीर बांधकामाविरोधात स्थानिक हिंदू (Hindu) संघटनेच्या नेत्याने तक्रार दाखल केली. या मशिदीची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच, हरिद्वार रुरकी विकास प्राधिकरणाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बेकायदेशीर मशिद सील केली. याप्रकरणी मशिदीला नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र त्या मशिदीच्या सदस्यांनी नोटीशीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान आता मशिदीचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) निर्देशानुसार, जिल्हा दंडाधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम किंवा नूतनीकरण करता येत नाही,असा आदेश दिला. महत्त्वाचे म्हणजे, अलीकडेच अधिकाऱ्यांनी मंगळौर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान ज्वालापूरमधील एका मशिदीचे अवैध भव्य द्वार पाडण्यात आले होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.